कृषी पंप वीज धोरण 2020 योजनेंर्तगत थकीत वीज बिल वसुली मोहिमेचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

कृषी पंप वीज धोरण 2020 योजनेंर्तगत थकीत वीज बिल वसुली मोहिमेचा शुभारंभ

 कृषी पंप वीज धोरण 2020 योजनेंर्तगत थकीत वीज बिल वसुली मोहिमेचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कृषी पंप वीज धोरण 2020 ह्या योजनेंर्तगत थकीत वीज बिल वसुली मोहिमेस आज राहुरी येथे माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.
       आजच्या  शुभारंभाच्या पहिल्याच दिवशीऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त  तनपुरे ह्यांच्या तालुक्यात शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून राहुरी उप विभागात 2लाख 50 हजार रुपये वसुल झाले असल्याची माहिती उपअभियंता धीरजकुमार गायकवाड ह्यांनी सांगितले.   शासनाच्या ह्या मोहिमेत तालुक्यातील तसेच राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील शेतकर्‍यांनी फायदा घ्यावा असे आवाहन माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना थकीत वीज बिल माफी योजना आणली असून राज्य सरकारने नुकतेच कृषी विषयक वीज धोरण 2020हे जाहीर केले असून त्यात शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यात 2018 सालापासून राज्यातील शेतकर्‍यांना नवीन कनेक्शन देणे तत्कालीन  सरकारने बंद केले होते.  महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेल्या कृषी विषयक वीज धोरणात नवीन वीज कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.
       राज्यातील शेतकर्‍यांकडे अनेक वर्षांपासून विजेची थकबाकी थकीत असून त्यासाठीही नवीन कृषी विषयक धोरणात थकीत बिल एकदम भरल्यास त्यास सवलत देण्यात घोषित करण्यात आली आहे. शेतकर्‍याने आपल्या कडील  थकीत वीज बिल भरल्यास त्यास 5वर्ष्या पूर्वीचे व्याज व दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मागील 5वर्षाचे दंड 100टक्के माफ करण्यात येणार असून व्याज आयोगाने ठरविलेल्यानुसार माफ करण्यात येईल. पहिल्या वर्षी 31मार्च पूर्वी थकीत वीज भरल्यास 50टक्के, दुसर्‍या वर्षी थकीत वीज भरल्यास 30टक्के तर तिसर्‍या वर्षी थकीत वीज बिल भरल्यास 20टक्के वीज बिल माफ होईल.
राहुरी विभागात आज अखेर 127कोटी रुपये थकबाकी असून त्यात वरील योजने दर्शविल्या प्रमाणे वीज बिल भरल्यास 78कोटी रुपये माफ होणार आहे. म्हणजे राहुरी विभागातील शेतकर्‍यांनी 49कोटी भरायचे आहे.  भरलेल्या रक्कमेतून राहुरी विभागास त्याच विभागातील दुरुस्तीसाठी 33टक्के रक्कम राहणार असल्याने कोणतेही काम पैसे नाही म्हणून थांबणार नाही.उर्वरित वसूल  रक्कमेतील 33 टक्के रक्कम ही जिल्ह्यात व उर्वरित रक्कम ही महावितरण कंपनीस जाणार आहे.जिल्ह्यातील 33टक्के रक्कमेत सुद्धा काही रक्कम तालुक्याला वापरण्यास जिल्हाधिकारी व पालक मंत्री ह्यांचे परवानगीने खर्चास मिळणार आहे.असे. महावितरणचे राहुरी विभागाचे उपअभियंता धीरजकुमार गायकवाड ह्यांनी सांगितले.
    आज महाविकास आघाडी सरकारच्या नवीन कृषी विषयक धोरणाच्या कार्यक्रमांतर्गत थकीत वीज बिल वसुली मोहिमेचा शुभारंभ माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांचे हस्ते करण्यात आला असून अनेक शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेत पैसे आणून भरले असून उर्वरित शेतकर्‍यांनी ह्या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन श्री तनपुरे ह्यांनी केले.यावेळी सहाय्यक उप अभियंता नितीन मुरकुटे बाबा कल्हापुरे नगरसेवक नंदकुमार तनपुरे तोडमल वकील प्रदीप तनपुरे वसंतराव गाडे सचिन गुमास्ते आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment