प्रत्येकाने काम करावे, तरच गावाचा विकास होईल ः डोंगरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

प्रत्येकाने काम करावे, तरच गावाचा विकास होईल ः डोंगरे

 प्रत्येकाने काम करावे, तरच गावाचा विकास होईल ः डोंगरे

वडगांवगुप्ताचे नुतन उपसरपंच बाबासाहेब गव्हाणे, तर तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश डोंगरे

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः गावात झालेल्या कामामुळे आपलं गावं आता प्रत्येकांच्या डोळयात भरले आहे.आपल्या गावाकडे पाहण्याचे दृष्टीकोन बदलला आहे.पद हे नावासाठी नसून कामासाठी आहे हे ध्येय ठरवूनच प्रत्येकाने काम करावे तरच गावाचा अजुन विकास होईल.  असे प्रतिपादन ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य जालींदर डोंगरे यांनी केले.
   वडगांवगुप्ता येथे सहविचार व ग्रामसभेत झालेल्या बैठकीत सर्वानुमते नुतन उपसरपंचपदी बाबासाहेब गव्हाणे तर तंटामुक्तीचे अध्यक्षपदी गणेश डोंगरे यांची निवड करण्यात आली.त्यांचा सत्कार ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य जालींदर डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
   सरपंच विजयराव शेवाळे,उपसरपंच बाबासाहेब गव्हाणे,प्राचार्य शिवाजीराव घाडगे,ग्रामसेवक भाउसाहेब अबुज, हुसैन सय्यद,तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश डोंगरे, ज्येष्ठ सदस्य जालींदरपाटील डोंगरे,अशोकराव गुडगळ, बापू गव्हाणे, योगेश निकम, नवनाथ शिंदे,नारायण शिंदे,विलास शेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य राजू शेवाळे, लक्ष्मण गव्हाणे, रावसाहेब घाडगे, किशोर डोंगरे, बाळू पवार,बाबासाहेब शेवाळे,अर्जुन डोंगरे,संतोष कासार, चॉद सय्यद,सावित्राम गुडगळ,भीमा डोंगरे,बबन कुर्‍हाळे, सोमनाथ आढाव, सुरेश डोंगरे,विपुल डोंगरे, डॉ.रामचंद्र सातपुते, सुरेश शिंदे,बाबा शिंदे,बाळासाहेब गव्हाणे,रघुनाथ गव्हाणे, भीमराज गव्हाणे उपस्थित होते.
   सरपंच शेवाळे म्हणाले की,सातत्याने वडगांवगुप्ता परीसराचा विकास कसा होईल हेच पाहीले जात आहे.यात सर्व सहकारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.एकोपामुळे अनेक कामे येथे होत आहेत.वृक्षदिंडी काढीत शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवडी हातभार लावला आहे. सर्वांना केलेल्या श्रमाचे चीज झाले असून सीनानदीवरील  बंधार्‍यामुळे  सर्व  गांव व गावातील प्रत्येक शेतकरी आनंदीत आहेत.

No comments:

Post a Comment