उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्यपदी शिंदे व धेंडे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्यपदी शिंदे व धेंडे यांची निवड

 उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्यपदी शिंदे व धेंडे यांची निवड



नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गठीत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य पदी श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार,नॅशनल  दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस  या संघटनेच्याच्या मीरा शिंदे आणि  प्रेरणा धेंडे यांची समितीचे अध्यक्ष तथा श्रीगोंदा पारनेरचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी नियुक्ती केली.
संयुक्त सचिव, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या अधिसूचना अन्वये अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मा. मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीच्या 2015 च्या बैठकीत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबतचे आदेश आहेत. त्या समितीमध्ये अनुसूचित जाती व जमातीतील सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश कारण्याबाबतचे आदेश असून पंचायत समिती गट विकास अधिकारी हे या समितीचे सचिव असतात. तर पोलीस उपाधिक्षक, तहसिलदार, अनुसूचित जाती जमातीचे पंचायत समिती सदस्य, अशासकीय संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते अशी समिती गठीत करण्यात आली आहे.
     श्रीगोंदा पारनेरचे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी सामाजिक कार्यकर्ते मीरा शिंदे आणि प्रेरणा धेंडे यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान श्रीगोंदा पारनेर तालुक्यात अनुसूचित जाती व जमाती यांच्या संदर्भात रोजच दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेवून त्यातील फिर्यादींना न्याय मिळवून देणार असल्याचे नवनिर्वाचित सदस्य शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक चळवळीत काम करणार्‍या मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment