काँग्रेस बळकटीकरण सप्ताहानिमित्त कर्जत येथे शहर कार्यकर्त्याचा मेळावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

काँग्रेस बळकटीकरण सप्ताहानिमित्त कर्जत येथे शहर कार्यकर्त्याचा मेळावा

 काँग्रेस बळकटीकरण सप्ताहानिमित्त कर्जत येथे शहर कार्यकर्त्याचा मेळावा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः
राजकारणात आपली ताकद असेल तर किंमत असते, आपली ताकद दिसली तर आपल्याला मित्र पक्ष ही विचारात घेतात म्हणून आपल्याला जबाबदारीने काम करावे लागणार आहे.राजकारनात नेता कसा असला पाहिजे व राजकारण कसे केले पाहिजे हे पाहण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा आदर्श घेतला पाहिजे, आगामी निवडणुकीत पक्षाची सत्ता कशी येईल यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे आवाहन आ. डॉ सुधीर तांबे यांनी केले.
    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहानिमित्त कर्जत येथे काँग्रेस शहर कार्यकर्त्याचा मेळावा अभय सांस्कृतिक भवन मध्ये सम्पन्न झाला    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ सुधीर तांबे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी केले यावेळी स्व. शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे,  जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समनव्यक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, ऍड माणिकराव मोरे, तात्यासाहेब ढेरे, युवकचे विधानसभा अध्यक्ष सचिन घुले, बापूसाहेब काळदाते, डॉ सुभाष सूर्यवंशी,  आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कर्जत तालुक्यात काँग्रेसच्या ताब्यात आलेल्या विविध ग्राम पंचायतीच्या पदाधिकार्‍याचा सत्कार करण्यात आला.
   आमदार डॉ सुधीर तांबे यानी बोलताना काँग्रेस ही सर्वसामान्यांचा विचार करणारी आहे, आजचे केंद्रातील शासनकर्ते मोकळेपणाने बोलू सुद्धा देत नाहीत, येन केन मार्गाने सत्ता मिळविन्यासाठी प्रयत्न करत आहेत, देशाचे पंतप्रधान हे पालक असतात मात्र मोदी यांना अहंकार झाला आहे. आज देशाची परदेशात निंदा होत आहे, अशा देशात लोकशाहीला बाधा येईल असे काम केले जात आहे. देशातील चांगल्या कंपन्या अंबानी, अदानी ना विकण्याचे काम केले जात असून या विरुद्ध काँग्रेसला लढावे लागेल. सध्या धर्माचे राजकारण केले जात असून काँग्रेसला बदनाम करण्याचे काम केले जात आहे.  आगामी काळात आपल्याला पक्षाचे सूक्ष्म काम करावे लागणार आहे, ना. थोरात यांच्या सारखे काम आपल्याला करायचे असल्याचे आवाहन आ. डॉ तांबे यांनी केले.
    जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी बोलताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी संघर्ष केला पाहिजे असे सांगत  सध्या केंद्रशासन शेतकर्‍यांविरुद्ध कायदे करत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्याना लढा उभारावा लागेल, अन्यथा केंद्राच्या काळ्या कायद्याने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय व्यक्ती भरडला जाणार आहे, त्यामुळे जनतेच्या भावना केंद्राला कळाल्या पाहिजेत, ना. थोरात यांनी माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रामाणिकपणाचे फळ म्हणून खूप काही दिले आहे त्यामुळे प्रत्येकाने पक्षाशी प्रामाणिक राहिले पाहिजे असा सल्ला ही साळुंके यांनी दिला.
      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष अमोल भगत, भाऊसाहेब तोरडमल, ओंकार तोटे, राजू बागवान, राम जहागीरदार, आदी सह अनेकानी विशेष परिश्रम घेतले. शेवटी प्रियेश सरोदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निलेश दिवटे यांनी केले. या बैठकीतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी नाना पाटोले यांची निवड झाल्याचे माहिती समजल्यानंतर बैठकीच्या शेवटी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी पटोले यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here