रविदास महाराजांचे तत्त्वज्ञान जागतिक किर्तीचे ः सोनग्रा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

रविदास महाराजांचे तत्त्वज्ञान जागतिक किर्तीचे ः सोनग्रा

 रविदास महाराजांचे तत्त्वज्ञान जागतिक किर्तीचे ः सोनग्रा

चर्मकार विकास संघाच्यावतीने रविदास महाराजांची जयंती साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः संत रविदास महाराजांचे तत्त्वज्ञान जागतिक किर्तीचे असून, त्यांचे तत्वज्ञान समजण्यासाठी भारताबाहेरील अनुयायी धडपडत आहे. पंधराव्या व सोळाव्या शतकात बदलाचे प्रवाह सुरु असताना, संत रविदासांनी कर्माचा सिध्दांत सर्वांपुढे मांडला. मानवतेचे विचार देऊन खरा जगण्याचा अर्थ समजवून सांगितला. श्रमिकांकडे तत्वज्ञानाचे केंद्र बनविले. परिश्रम करुन जगण्याचा संदेश देऊन श्रमिकांना प्रतिष्ठा मिळवून दिली. नाहीतर भारतात श्रमिकांना श्रुद्र मानले जात होते. त्याचे विचार आजही सर्व समाजाला प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांनी केले.
   सावेडी येथे चर्मकार विकास संघाच्या वतीने कर्माचा जीवनमंत्र सांगणारे थोर संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सोनग्रा बोलत होते. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संत रविदास महाराजांची आरती करण्यात आली. याप्रसंगी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, नानासाहेब कदम, सर्जेराव गायकवाड, तुकाराम गायकवाड, राजेंद्र धस, निलेश आंबेडकर, अर्जुन कांबळे, अदिनाथ बाचकर, संतोष कांबळे, संतोष कदम, अर्जुन कांबळे, भानुदास नन्नवरे, भिकाजी वाघ, शंकर शेवाळे, सोपान कदम, वैभव कदम, अशोक आंबेडकर, नवनाथ पोटे, अशोक आंबेडकर, गंगाधर ठाणगे,  दिलीप पीडीआर, भोलेनाथ तेलोरे, राजेंद्र सरोदे, दशरथ सातपुते, बन्सी केदार, संदीप डोईफोडे, अकाश गायकवाड, विकी कबाडे आदी उपस्थित होते.
    पुढे बोलताना सोनग्रा म्हणाले की, सर्व संत, महात्म्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केले. मात्र समाजाने संत, महापुरुष वाटून घेतल्याने समाज एकमेकापासून दुरावत आहे. संजय खामकार यांनी चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून चर्मकार समाजाबरोबर इतर समाजालादेखील बरोबर घेऊन जोडण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. संत रविदास महाराज भारतापुरते मर्यादित नसून, इंग्लंड मधील बर्निंगहॅममध्ये त्यांचे मोठे मंदिर आहे. तर कॅनडामध्ये त्यांचे अनुयायी आहेत.

No comments:

Post a Comment