यशवंत गाडे विद्यालयात माझी वसुंधरा अभियान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

यशवंत गाडे विद्यालयात माझी वसुंधरा अभियान

 यशवंत गाडे विद्यालयात माझी वसुंधरा अभियान


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः फकिरवाडा ( मुकुंदनगर ) येथील यशवंत गाडे माध्यमिक विद्यालयात आज मुलांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली . माझी वसुधंरा अभियानातंर्गत आज मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता कडलग यांनी सर्व मुलांना पर्यावरण संरक्षण व वसुधंरा संवर्धनाची शपथ दिली .यावेळी मुलांना पर्यावरणाचा बिघडता समतोल व मुलांनी पाळायची जबाबदारी याचे धडे देण्यात आले .पर्यावरणाची होत असलेली हानी याबाबत मुलांनी पालकांना जागृत करून आपल्या वसुधंरेची काळजी कशी घ्यावी याबाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावे, मास्क व सॅनिटायझर चा वापर नियमित करावा असे आवाहन करण्यात आले. कोव्हीड 19 च्या नियमांचे काटेकोर पालन करून विदयालयात माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले.

No comments:

Post a Comment