भिंगार बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न चांगली तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेवरील विश्वास वाढत आहे- अनिल झोडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

भिंगार बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न चांगली तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेवरील विश्वास वाढत आहे- अनिल झोडगे

 भिंगार बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न चांगली तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेवरील विश्वास वाढत आहे- अनिल झोडगे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः भिंगार बँकेला 100 वर्षांहून अधिक अशी परंपरा आहे, यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. यात स्व.गोपाळराव झोडगे यांनी बँकेची धुरा अनेक वर्ष सांभाळून बँकेला प्रतिष्ठा मिळवून दिली. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा विश्वास आणि संचालक मंडळाचे सहकार्य यामुळे आज बँक प्रगतीपथावर आहे. बँकेने काळानुरुप बदलून अत्याधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्याने बँकेच्या सेवेत भर पडत आहे. त्यामुळे ग्राहकांनाही चांगली तत्पर सेवा मिळत असल्याने बँकेवरील विश्वास वाढत आहे. बँकिक क्षेत्रातील प्रचंड स्पर्धा सातत्याने घडणारे बदल आणि सभासद खातेदारांच्या वाढत्या अपेक्षा या पार्श्वभुमीवर बँकेने अहवाल वर्षात भरीव नेत्रदिपक प्रगती साध्य केली असल्याचे प्रतिपादन भिंगार अर्बन को-ऑप बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे यांनी केले.
   भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या सर्वसाधारण सभेत चेअरमन अनिलराव झोडगे बोलत होते. याप्रसंगी  व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, संचालक रमेश परभाने, नाथाजी राऊत, राजेंद्र पतके, कैलास खरपुडे, संदेश झोडगे, विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, नामदेव लंगोटे, कांताबाई फुलसौंदर, तिलोत्तमा करांडे, तज्ञ संचालक आर.डी.मंत्री, राजेंद्र बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी पांडूरंग हजारे आदि उपस्थित होते.
यावेळी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी म्हणाले, मध्यंतरी कोरोनाच्या काळात बँकेचे कामकाज विस्कळीत झाले होते.  बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना चांगली सेवा देण्याचा बँकेने सातत्याने प्रयत्न केला आहे. सर्वांच्या सहकार्याने बँकेने आपल्या कामात सातत्य ठेवून लौकिक कायम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी आर.डी.मंत्री म्हणाले, बँकींग क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. आधुनिक सेवा देणार्या बँकांना ग्राहकांची पसंत राहत असते. त्यादृष्टीने भिंगार बँकेनेही अत्याधुनिक सुविधा स्वीकारुन सेवा देत आहे. त्यामुळे बँकेच्या प्रगतीत भर पडत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथाजी राऊत यांनी केले तर आभार पांडूरंग हजारे यांनी मांडले. प्रारंभी बँकेचे अनेक वर्षे चेअरमन राहिलेले स्व.गोपाळराव झोडगे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या गुणवंत व मान्यवरांचा बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आले. यावेळी सहकार विभागाच्यावतीने संचालक व सभासदांसाठीचे प्रशिक्षणही पार पाडले.

No comments:

Post a Comment