रस्ते सुरक्षा अभियानाचा गुरुवारी समारोप, रोटरी सेंट्रलतर्फे मोफत नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 16, 2021

रस्ते सुरक्षा अभियानाचा गुरुवारी समारोप, रोटरी सेंट्रलतर्फे मोफत नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर

 रस्ते सुरक्षा अभियानाचा गुरुवारी समारोप, रोटरी सेंट्रलतर्फे मोफत नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सध्या नगर शहर तसेच जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान सुरु असून या काळात वाहतूक नियमांबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचा समारोप गुरुवार दि.18 फेब्रुवारी रोजी मोफत नेत्रतपासणी आणि रक्तदान शिबिराने होणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्यावतीने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.18 रोजी सकाळी 10.30 वाजता या नगर कॉलेजजवळील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखर्णा यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील असतील, अशी माहिती रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले यांनी दिली.
   रोटरी सेंट्रलचे सेके्रटरी ईश्वर बोरा व प्रोजेक्ट चेअरमन डॉ.दिलीप बागल यांनी सांगितले की, रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन अत्यावश्यक आहे. या जोडीलाच वाहन चालकाचे डोळ्याचे आरोग्यही महत्त्वाचे असते. ही बाब लक्षात घेवून या अभियानाच्या समारोपप्रसंगी मोफत नेत्रतपासणी शिबीर होणार आहे. सवार्ंनाच याचा लाभ घेता येणार असून नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रसन्न खणकर शिबिरात नेत्र तपासणी करतील. याशिवाय याठिकाणी रक्तदान शिबिरही होणार असून प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले आहे. डोळ्यांचे आरोग्य राखण्याबरोबरच रक्तदान करून एका महत्त्वाच्या कार्यात सहभागी होण्याची संधी यानिमित्त सर्वांना मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच रक्तदानाच्या मानवतेच्या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन रोटरी सेंट्रलचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here