नगर मनपा विजयासाठी आत्तापासूनच कंबर कसणार - किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

नगर मनपा विजयासाठी आत्तापासूनच कंबर कसणार - किरण काळे

 नगर मनपा विजयासाठी आत्तापासूनच कंबर कसणार - किरण काळे

काँग्रेसचा पंजाब मनपा निवडणुकीतील घवघवीत विजय साजरा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नुकत्याच पंजाबमध्ये पार पडलेल्या सात मनपाच्या निवडणुकीमध्ये सहा ठिकाणी काँग्रेसला निर्विवाद सत्ता मिळाली. मोगा मनपामध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवत मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले.
   दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना पार पडलेल्या या निवडणुकांत मतदारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार चपराक दिली आहे. काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत विजयाबद्दल नगर शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
   शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, काँग्रेस पक्षच देशाला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देऊ शकतो. भाजपच्या जुलमी राजवटीला पूर्णतः नाकारण्याचे काम पंजाब मधील जनतेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करत काँग्रेसला आपली पसंती दिली आहे.
   नगर शहरामध्ये देखील भाजप प्रणित अभद्र युतीची महापालिकेमध्ये सत्ता आहे. शहराची दैनावस्था झाली आहे. अशावेळी सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत असतानाच आगामी मनपाच्या निवडणुकीसाठी जनतेला अपेक्षित असणारा शहराचा विकास घडविण्यासाठी काँग्रेसच्या विजयाची गुढी उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कंबर कसून कामाला लागावे असे, आवाहन काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.
   माळीवाडा परिसरामध्ये शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावत पेढे भरविले. तसेच यावेळी नागरिकांना देखील पेढ्यांचे वाटप करीत विजयाचा आनंद कार्यकर्त्यांनी साजरा केला.
   यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, निजाम जहागीरदार, अनिस चुडीवाल, डॉ.मनोज लोंढे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, प्रा.डॉ.बाळासाहेब पवार, प्रवीण गीते, अन्वर सय्यद, मुबीन शेख, सुजित जगताप, निखिल गलांडे, नलिनी गायकवाड, कौसर खान, नीता बर्वे, सुनिता बागडे, उषा भगत, जरीना पठाण, ऋतिक शिरवाळे, कॅ.रिजवान शेख, गणेश आपरे, मोहनराव वाखुरे, ड.सुरेश सोरटे, अजय मिसाळ, शंकर आव्हाड, फहिम इनामदार ऋषिकेश चितळकर, वैभव कांबळे, शिवम करांडे, अनविश गुंड, तन्मय सांगळे, ओम जगताप, तन्मय गुंड, संकेत गवळी,अमित गुंड आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here