ओबीसी बारा बलुतेदार महासंघातर्फे पद्मानगरला जयंती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

ओबीसी बारा बलुतेदार महासंघातर्फे पद्मानगरला जयंती साजरी

 ओबीसी बारा बलुतेदार महासंघातर्फे पद्मानगरला जयंती साजरी

महिलांचा आदर, सन्मान करणे ही शिवरायांची विचारधारा प्रत्येकाकडे पाहिजे - शाम औटी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ःभाऊ जसा बहिणीशी वागतो आणि मुलगा जसा आईशी वागतो तसे शिवाजीराजे शत्रुंच्या विरोधकांच्या स्त्रीयांशी देखील वागायचे महिलांचा आदर, सन्मान करणे ही उच्च कोटीची विचारधारा आहे ती महाराजांकडे होती तशी आज प्रत्येक माणसाकडे पाहिजे, असे प्रतिपादन शहराध्यक्ष शाम औटी यांनी केले.

ओबीसी बाराबलुतेदार महासंघातर्फे पाईपलाईन रोडवरील पद्मानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्री.औटी बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, ओबीसी, व्हीजे एनटी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, राजेश सटाणकर, अनिल इवळे, रमेश बिडवे, अनिल निकम, अशोक औटी, जगन्नाथ औटी, गणेश औटी, छाया नवले, दिलीप मते आदि उपस्थित होते.

श्री.औटी पुढे म्हणाले, आज शिवाजी महाराजांच्या विचारांची- आचारांची खरी गरज प्रत्यक्षात आत्मसात करण्याची  गरज आहे. राजेंचा इतिहास हा शौर्याचा, धैर्याचा आहे. तसाच तो औदार्याचा देखील आहे. जेवढे ते कर्तव्य कठोर होते तेवढेच ते कनवाळू होते. 

याप्रसंगी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, प्रभागाचे नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी भेट देऊन अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण कधीच विसरु शकत नाही. त्यांच्या पराक्रमाबाबत उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाम औटी यांच्या उपक्रमाबद्दल आ.जगताप यांनी कौतुक केले. यावेळी प्रशांत पाटील, अंकुश चत्तर, नारायण जोशी, राजू कदम, ज्ञानेश्वर शिरसाठ, आबा चव्हाण, गोपाळ महाराज, रवी चोथे, संदिप घुले, मल्हारी गिते, आदिनाथ गायकवाड, पद्मानगरमधील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment