खर्डा येथे आ. रोहितदादा पवार विचार मंच स्वच्छता अभियानास शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

खर्डा येथे आ. रोहितदादा पवार विचार मंच स्वच्छता अभियानास शुभारंभ

 खर्डा येथे आ. रोहितदादा पवार विचार मंच स्वच्छता अभियानास शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी

खर्डा ः सोनेगाव येथील गायवळ कुटुंबाने कोरोणाच्या काळात निस्वार्थीपणे समाजाची सेवा केली त्यांच्या सारख्या माणसांचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे असे उद्गार पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे यांनी व्यक्त केले.
   खर्डा येथे आमदार रोहितदादा पवार विचार मंच आयोजित स्वच्छता अभियान शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ,माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात सिताराम बाबा गडाचे महंत महालिंग नगरे महाराज,युवराज गोलेकर, सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे,कल्याण सुरवसे, कपिल लोंढे चंद्रकांत गोलेकर शिवाजी भोसले, सुनील साळुंखे, तुळशीदास गोपाळघरे,फजल पंजाबी इत्यादी उपस्थित होते.
   ते बोलताना पुढे म्हणाले की कोरोणाच्या काळात सचिन गायवळ व त्यांचे बंधू उद्योगपती निलेश भाऊ गायवळ यांनी जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला तसेच किराणा, भाजीपाला वाटप केले शासकीय कार्यलयाला सॅनिटायझर मशीन दिले डॉक्टर आरोळे यांच्या कोविड सेंटरला तीन लाख रुपयांची मोफत औषधे दिले त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला त्याचा फायदा झाला आहे त्यांचा यथोचित सन्मान खर्डा येथील आमदार रोहित दादा विचार मंचच्या अध्यक्ष दत्तराज पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या हातून असेच समाजकार्य घडो असे ते म्हणाले.
    यावेळी बोलताना प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणाले की आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेने सचिन गायवळ यांनी सर्वसामान्य लोकांना विविध माध्यमातून सहकार्य केले अशीच सेवा त्यांच्या कडून पुढील काळात होवो असे ते म्हणाले. यावेळी महालिंग नगरे महाराज यांनी मार्गदर्शन केले
सत्काराला उत्तर देताना सचिन गायवळ म्हणाले की,मी कमी बोलतो पण काम जास्त करतो व त्यांनी पुढील काळात  मी सदैव आपल्या सेवेत राहील असे सांगितले.
     याप्रसंगी संतोष साबळे, बापूसाहेब ढगे, सोनेगावचे सरपंच पद्माकर बिरंगळ , डॉक्टर विशाल वायकर, शेरखान पठाण, बाबासाहेब मोरे, आयुब शेख, राजू सय्यद, गुरुराज पवार, टील्लू पंजाबी, रामहरी गोपाळघरे, सुरज रसाळ, भास्कर मुंढे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता जावळे महिला बचत गटाच्या निता पवार,भिकन तांबोळी इत्यादी खर्डा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.रोहितदादा पवार विचार मंच खर्डा अध्यक्ष दत्तराज पवार यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment