वाहतूक कोंडीची समस्या ट्रॅफिक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सोडविणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

वाहतूक कोंडीची समस्या ट्रॅफिक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सोडविणार

 वाहतूक कोंडीची समस्या ट्रॅफिक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सोडविणार

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा मनोदय

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे पुण्यात मनोज पाटील हे ’ पाटील या नावाने प्रसिद्ध झाले होते. किरण काळे यांनी आपण नगरचे देखील वनवे पाटील होणार का ? असा प्रश्न विचारला असता, नगर शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ट्राफिक इंजिनीअरिंगचा उपयोग करण्याचा मनोदय जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला. कापड बाजार परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुयोग्य नियोजन केले जाईल.  पोलिस, नागरिक यांना एकत्रित मिळून वाहतूक समस्येवर काम करावे लागेल अशी अपेक्षा ही पाटील यांनी व्यक्त केली.
   अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहांतर्गत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनोज पाटील यांची जाहीर मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
   स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी विशेषत: ग्रामीण भागातील मुलांनी कोणताही न्यूनगंड मनात बाळगू नये  मी स्वतः शालेय अभ्यासात सामान्य गुण मिळविणारा विद्यार्थी होतो. तरी देखील स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवू शकलो. प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची वृत्ती अंगीकारल्यास यश निश्चित मिळते, असे ही पाटील म्हणाले.
   स्पर्धा परीक्षा, पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील संवादाची गरज, वाहतूक कोंडी, युवती - महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था अशा अनेक विषयांवरील विविध प्रश्नांना पाटील यांनी यावेळी दिलखुलास उत्तरे दिली. कंप्यूटर इंजिनियर असणारे पाटील यांनी दोन वर्ष अध्यापक म्हणून काम केले आहे. आपल्याला घडवण्यामध्ये आपल्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचे तसेच सेवेतील वरिष्ठ तसेच कनिष्ठ सहकार्‍यांकडून देखील अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले. नगर जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक चांगले अधिकारी दिले आहेत. आपल्या कार्यकाळात नगरमध्ये अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. नागरिकांची कामे ठराविक कालमर्यादेत पूर्ण व्हावीत यासाठी ई-टपाल सेवा सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर पोलीस प्रश्नाला पेपरलेस करण्यासाठी आणि समाजातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्वसामान्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
   किरण काळे यांनी यावेळी मनोज पाटील यांना जाहीर ग्वाही दिली की, नगर शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां कडून कधीही कोणतेही लाजीरवाणे काम होणार नाही. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याला काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजून अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि.चिरंजीव गाढवे यांनी केले. भूमिका प्रशांत जाधव यांनी विशद केली. यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. बाळासाहेब पवार, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी मनोगते व्यक्त केली. सुजित जगताप, कु.किरण वाडेकर यांनी आभार मानले. योगेश जस्वाल, सचिन वारुळे,धुळाजी महारनवर, कु. शामल पवार यांच्यासह विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी काम पाहिले.

No comments:

Post a Comment