‘माझी वसुंधरा’ अभियानास नागरिकांचे सहकार्य हवे ः डांगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

‘माझी वसुंधरा’ अभियानास नागरिकांचे सहकार्य हवे ः डांगे

 ‘माझी वसुंधरा’ अभियानास नागरिकांचे सहकार्य हवे ः डांगे

हवेतील घटकांची तपासणी कामाचा शुभारंभ

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः 
दिवसेंदिवस क्रतुमानात होणार्‍या बदललामुळे पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. यासाठी राज्य सरकारने माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. शहरातील हवेची गुणवत्ता तपासणीचे काम सुरु केले असून याचा अहवाल येत्या 10 दिवसात आपल्याला प्राप्त होणार असून त्यानंतर त्रुटी आढळ्यास त्यावर उपाययोजना करण्यात येतील. माझी वसुंधरा अभियानामध्ये नागरिकांना भाग घ्यावा, असे प्रतिपादन उपायुक्त यशवंत डांगे यांनी केले.
   यावेळी बोलताना संतोष लांडगे म्हणाले की, या अभियानातून शहराच्या स्वच्छतेत, सुंदरता व पर्यावरणात बदल घडवायचे आहे. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, हा उद्देश आहे. हवामानातील घटकांचा अभ्यास करुन त्यामधील त्रुटी दूर करुन उपाययोजना केले जातील.
   राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने हवेची गुणवत्ता तपासणीच्या कामाची पाहणी करताना उपायुक्त यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, उद्यान अधिकारी उद्धव म्हसे, किशोर कानडे, अश्वमेध इंजिनिअरिंग कंपनीचे दिलीप जाधव, धनंजय जगताप आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment