नूतन स्थायी समिती सदस्य शिंदे व गायकवाड यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

नूतन स्थायी समिती सदस्य शिंदे व गायकवाड यांचा सत्कार

 नूतन स्थायी समिती सदस्य शिंदे व गायकवाड यांचा सत्कार

शहरातील विकासकामांसाठी शिवसेनेचा पुढाकार- संभाजी कदम

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता नसली तरी सक्षम विरोधक म्हणून शिवसेना नगरसेवक आपल्या अग्रही भुमिकेमुळे शहराच्या विकास कामात योगदान देत आहेत. शहरातील विकासकामे व्हावीत यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. आपल्या प्रभागातील कामाबरोबरच शहराच्या विकास कामांसाठी विशेष प्रयत्न केलेले आहे, त्यामुळे मनपाच्या स्थायी समिती सदस्यपदी  नगरसेवक सचिन शिंदे व प्रशांत गायकवाड यांची झालेली निवड योग्य अशीच आहे. स्थायी समितीच्या माध्यमातून ते शहरातील विकास कामांना चालना देतीलच त्याचबरोबर शिवसेना नगरसेवकांच्या रास्त मागण्यांबाबतही पाठपुरावा करतील, असा विश्वास शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
   महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी नगरसेवक सचिन शिंदे व प्रशांत गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बबलू शिंदे, बंटी खैरे, शेखर आढाव आदि उपस्थित होते. सत्कारास उत्तर देतांना सचिन शिंदे म्हणाले, मनपाच्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या अनेक योजना राबविल्या जात असतात. या योजनांमध्ये स्थायी समितीची महत्वाची भुमिका असल्याने यामध्ये शहर विकासाबाबत  सकारात्मक निर्णय घेऊ. शिवसेना नगरसेवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन शहरात चांगले काम करण्याचा आपण प्रयत्न करु, असे सांगून सत्काराबद्दल आभार मानले.

No comments:

Post a Comment