नगरसेविका दिपालीताई बारस्कर यांची आमदारांकडेकडे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मागणी
प्रभाग क्र. 1 मधील बिरोबा मंदिर फणसे मळा या भागाचा पाणी प्रश्न मार्गी लावू - आ. संग्राम जगतापनगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महानगरपालिका प्रभाग क्र. 1 मधील बिरोबा मंदिर फणसे मळा या भागाचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे. मनपाच्या माध्यमातून या भागाला आजपर्यत पाणी पुरवठा केला जात नाही. नगरसेविका मा.सौ.दिपालीताई बारस्कर यांनी या भागाचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी मनपाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आज मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांचेकडे या भागाचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सुटावा यासाठी शिष्टमंडळासह भेट घेवून चर्चा केली. गेल्या 10 वर्षापासून या भागामध्ये मोठया प्रमाणात नागरी वसाहत वाढत आहे. परंतु या भागाचा पाणी प्रश्न गंभीर असल्यामुळे रहिवाश्यांची आतोनात हाल होत आहेत. विविध नागरी मुलभूत प्रश्नांना याभागातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. मनपाने आतापर्यत कोणतीही पाणी योजना मंजूर केली नाही. तरी या भागातील पाणी पुश्न लवकरात लवकर सुटावा नगरसेविका मा.सौ.दिपालीताई बाळासाहेब बारस्कर व या भागातील नागरिकांनी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांचेकडे केली आहे.
प्रभाग क्र. 1 मधील बिरोबा मंदिर फणसे मळा या भागाचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांची भेट घेवून चर्चा करताना सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.बाळासाहेब बारस्कर, मा.श्री.सागर ससे, मा.श्री. साईनाथ मोरे मा.श्री.विलास मोरे मा.श्री.विकास कर्डिले, मा.श्री. विजय वाघ, मा.श्री.विजय चव्हाण, मा.श्री.आसाराम सोनार, मा.श्री.तात्यासाहेब गोरे, मा.श्री.संभाजी उमाप यांचेसह आदी नागरिक उपस्थित होते. .
आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी शिष्ट मंडळास सांगितले की, लवकरच मनपा अधिकारी यांची बैठक बोलावून या भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नगरशहराचा विस्तार मोठया प्रमाणात वाढत आहे. नागरिकांच्या मुलभूत प्रश्न पासून प्रश्न सोडवावे लागत आहे. या भागातील पाणी प्रश्ना बरोबर इतर प्रश्नही लवकरच मार्गी लावू असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment