पुणे विद्यापिठाचा मानाचा ‘युवा पुरस्कार’ 2021 तन्मय देवचके यास प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 11, 2021

पुणे विद्यापिठाचा मानाचा ‘युवा पुरस्कार’ 2021 तन्मय देवचके यास प्रदान

 पुणे विद्यापिठाचा मानाचा ‘युवा पुरस्कार’ 2021 तन्मय देवचके यास प्रदान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या 72व्या वर्धापन दिन निमित्ताने दरवर्षी दिल्या  जाणार्‍या ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ सोबत मागील वर्षांपासून सुरू झालेला ’युवा गौरव पुरस्कार’ (कलाक्षेत्रासाठी) तन्मय देवचके यास प्रदान करण्यात आला आहे. आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे हिस पहिला कलाक्षेत्रातील युवा गौरव पुरस्कार मिळाला. यंदाच्या वर्षी तो मान तन्मय देवचके यास मिळाला.
   कोव्हीङची पार्श्वभूमी असल्यामुळे प्रेक्षक संख्येवर मर्यादा असूनही राज्यभरातून अनेक लोक या सोहळ्याला उपस्थित होते. विद्यापीठाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ समाज सेवक पद्मश्री श्री रवींद्र कोल्हे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
त्यानंतर कला क्षेत्रातील युवा गौरव पुरस्कार तन्मय देवचके यास दिला. मानपत्र आणि 25000 असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराच्या बरोबरीनेच या दिग्गज मान्यवरांसोबत मंचावर बसण्याची संधी मिळाली हाही मोठा गौरवच अशी भावना तन्मय ने मनोगता वेळी व्यक्त केली तसेच याचे संपूर्ण श्रेय प्रथम गुरू आजोबा गोपाळराव देवचके, वडील अभय देवचके, प्रकाश शिंदे, पंडित प्रमोद मराठे यांनाच आहे असेही सांगितले. ललित कला केंद्र पुणे विद्यापीठाचे माझ्या आयुष्यातील स्थान अनन्यसाधारण आहे. श्री सतीश आळेकर, श्रीमती शुभांगी बहुलीकर, श्री. प्रवीण भोळे यांनी वेळोवेळी केलेले योग्य मार्गदर्शन खूपच उपयुक्त ठरले. विद्यापीठाने केवळ गुरु पैसा प्रसिद्धी हेच नाही तर उत्तम सहचारिणी प्रचिती च्या रूपाने मिळवून दिली हे सांगताच उपस्थितांनमधून टाळ्यांचा आणि हास्याचा गजरात दाद मिळाली. उस्ताद झाकीर हुसेन, गानसरस्वती किशोरीताई, पं उल्हास कशाळकर, पं सुरेश तळवलकर यांसारख्या दिग्गजांचा सहवासातून वेळोवेळी मिळणारी प्रेरणा देखील या पुरस्काराच्या मागे आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्या सोबत वेळ घालवताना त्यांच्या सदिच्छांचा वाटाही मोठा आहे. आज पर्यंत जे काही केलं म्हणून नाही तर आता यापुढे जे करायचं आहे यासाठीची प्रेरणा म्हणून या पुरस्कारा कडे पाहतो आहे अशी भावना व्यक्त करून तन्मयने मनोगत संपवले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here