योग्य मदतीमुळे समाजातील दुर्बलांना जगण्याचे बळ मिळते : गुगळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 23, 2021

योग्य मदतीमुळे समाजातील दुर्बलांना जगण्याचे बळ मिळते : गुगळे

 योग्य मदतीमुळे समाजातील दुर्बलांना जगण्याचे बळ मिळते : गुगळे

जैन ओसवाल वात्सल्य संस्थेतर्फे 70 गरजूंना किराणा वाटप

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जैन ओसवाल वात्सल्य संस्था नावाप्रमाणेच वात्सल्य दर्शवणारे काम करीत आहे. गरजूंना त्यांचा स्वाभिमान कायम ठेवत मदत करणे ही खरी मानवसेवा आहे. भारतीय संस्कृती अशा उदात्त विचारांची शिकवण कायम देत आली आहे. त्यामुळेच समाजातील दुर्बलांना जगण्याचे बळ मिळते. त्यांच्याही आयुष्यात आनंदाचे क्षण येतात. अशा कार्याला हातभार लावता येणे ही परमेश्वराचीच कृपा आहे, असे प्रतिपादन निर्मलाताई राजमल गुगळे यांनी केले.
   जैन ओसवाल वात्सल्य संस्थेतर्फे दर महिन्याच्या उपक्रमानुसार या महिन्यातही समाजातील 70 आर्थिक दुर्बल कुटुंबांना महिनाभर पुरेल इतक्या किराणाचे वाटप केले. यंदा स्व.राजमल उत्तमचंद गुगळे (पाथर्डीवाला) यांच्या स्मरणार्थ ही मदत करण्यात आली. यावेळी महावीर गुगळे, निर्मलाताई गुगळे, आडतेबाजार मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, सेक्रेटरी विजय गुगळे, अशोक (बाबुशेठ) बोरा, ईश्वर बोरा, मूळचंद डागा, जय आनंद मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष नंदलाल कोठारी, संतोष कर्नावट, नूतनबाई गांधी आदी उपस्थित होते.
   या सामाजिक उपक्रमासाठी सौरभ बोरा, प्रमिलाबाई बोरा, चंपालाल मुथा, सुनिल मुनोत (नेवासकर), पनालाल बोगावत, अजय बोरा, अभय श्रीश्रीमाळ, सतिष मुथा, किशोर गुगळे, किशोर पितळे आदींचे सहकार्य लाभले. करोना नियमावली, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.
   राजेंद्र चोपडा म्हणाले की, स्व.सुवालालजी गुंदेचा यांनी जैन वात्सल्य संस्थेच्यामार्फत कायम समाजातील गरजूंचा मदत केली. त्यांची हीच परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न होत असून या उदात्त कार्यात अनेकांचे सहकार्य लाभत आहे. भविष्यातही ही समाजसेवा आणखी व्यापक करण्याचा प्रयत्न राहिल. ईश्वर बोरा यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here