प्रेमीयुगुलांची रेल्वेखाली आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

प्रेमीयुगुलांची रेल्वेखाली आत्महत्या.

 प्रेमीयुगुलांची रेल्वेखाली आत्महत्या.


मनमाड-
दौंड रेल्वेमार्गावर येळपणे (श्रीगांदे) येथील विवाहित तरुण आणि तरुणीने रेल्वेखाली आत्महत्या केली. पहाटे अडीच्या सुमारास ही घटना घडली. राजू बाबा कोळपे (वय 38) व राणी राजेंद्र साबळे (वय 30) अशी मृताची नावे आहेत. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून श्रीगोंदा- बेलवंडी पोलीस तपास करत आहेत.

   सदर घटनेची हकीकत अशी की, राजू व राणी दोघे विवाहित असून सोमवारी (ता.1) सकाळी 11 वाजता दोघेही घरातून बाहेर पडले. महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या दोघांची शोधाशोध सुरू असतानाच आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दोघांनी मनमाड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
   पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. या दोघांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट झाले नसले तरी ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा आहे. दरम्यान राजू कोळपे यांना दोन मुली, एक मुलगा तर राणी साबळे यांना मुलगा, मुलगी आहे. याबाबत पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ’रेल्वे मार्गावर दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा असली तरी याबाबत अधिक तपास केला जात आहे. तपासात सर्व बाबी स्पष्ट होतील.’

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here