10 फेब्रुवारीच्या अपघात प्रकरणी दोषीवर कारवाई करावी ः सय्यद शफी बाबा यांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

10 फेब्रुवारीच्या अपघात प्रकरणी दोषीवर कारवाई करावी ः सय्यद शफी बाबा यांची मागणी

 10 फेब्रुवारीच्या अपघात प्रकरणी दोषीवर कारवाई करावी ः सय्यद शफी बाबा यांची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर येथील कोठला चौक भागात दि.10 फेब्रुवारी रोजी घडलेल्या अपघात प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचारीयांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे विश्व मानवाधिकार परिषदेचे सय्यद शफी बाबा यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
   निवेदनात म्हंटले आहे की, येथील कोठला चौकात दि.10 फे्रब्रुवारी रोजी कोठला चौकात कंटनेच्या धउकेत अपघाती निधन झाले. यामध्ये असेलला कंटेनर नगर शहरामध्ये आलाच कसा असा सवाल विचाण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे कोण पालन करीत नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या वाहनास प्रवेश देणार्या अधिकारी अथवा कर्मचार्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. त्यांच्या गलथान कारभारामुळे एका 19 वर्षीय युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. उड्डाणपुलाचे काम सध्या सुरु असल्याने जिल्हाधिकारी यांनी जड वाहतुक बायपास रोडने वळली आहे. मात्र तरीही कंटनेर नगर शहरात आलाच कसा हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. तरी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अज्जुभाई शेख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अलताफ शेख, चंद्रकांत उजागरे, शरिफ सय्यद, प्रशांत थोरात आदि उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment