छत्रपती संभाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळा संदर्भात त्वरित निर्णय व्हावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

छत्रपती संभाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळा संदर्भात त्वरित निर्णय व्हावा

 छत्रपती संभाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळा संदर्भात त्वरित निर्णय व्हावा

संभाजी कदम यांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर शहरातील सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णांकृती पुतळ्याबाबत महानगरपालिकेत ठराव होऊन देखील सुद्धा मनपा प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नाही. तसेच महात्मा फुले यांचा पुतळा शहरात (माळीवाडा परिसर) उभारण्याबबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे दोन्ही विषय शहराच्या व जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. नुकत्याच राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या बेठकीत या दोन्ही विषय चर्चा झालेली आहे.
या संदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तात्काळ पुतळ्यासंदर्भातील विषय मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. पुतळ्याच्या संदर्भात स्थनिक पातळीवर जी समिती नियुक्त करण्यात आली आहे, त्यांनी हा विषय तात्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणेला तात्काळ सूचना देऊन बेठकीत ठरल्याप्रमाणे पुतळा परवानगीबाबतचा अहवाल हा नगरविकास खात्याकडे तात्काळ कशा पद्धतीने कशा जाईल, याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत अशी मागणी माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहेत. तसेच वरील निवेदनाच्या प्रति या पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांना देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment