विझार्ड कंप्युटर्स संस्थेच्यावतीने महिलांना मोफत इंटरनेट प्रशिक्षण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

विझार्ड कंप्युटर्स संस्थेच्यावतीने महिलांना मोफत इंटरनेट प्रशिक्षण

 20 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम

विझार्ड कंप्युटर्स संस्थेच्यावतीने महिलांना मोफत इंटरनेट प्रशिक्षण
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर मध्ये गेल्या 20 वर्षापासून संगणक प्रशिक्षण क्षेत्रात योगदान देणार्‍या विझार्ड कंप्युटर्स संस्थेच्या 20 वा वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून भाजी विक्रेत्या, छोट्या दुकानदार व गरजू महिला व मुलींना मोफत इंटरनेटचे प्रशिक्षण कोर्स देण्यात आला. प्रोफेसर कॉलनी चौकातील विझार्ड कंप्युटर्स संस्थेचे संचालक रवींद्र राउत यांनी राबवलेल्या या उपक्रमात प्रोफेसर कॉलनी चौंकातील महिला सहभागी झाल्या होत्या.
   वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व महिलांना या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आली. अनघा राऊत म्हणाल्या, विझार्ड कंप्युटर्स संस्थेच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांत शासकीय अधिकारी, कर्मचारी, छोटेमोठे उद्योग करू पहाणारे व्यवसायिक, गृहिणी, विद्यार्थी असे हजारो प्रशिक्षणार्थीं यशस्वीपणे संगणक प्रशिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात ते यशस्वीपणे काम करीत आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाच्या संगणक प्रशिक्षणाच्या विविध योजना राबविल्या जात असून ज्या व्दारे अनेक गरजु विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त झाला आहे.  यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी शैलजा ससाणे, कांता चंगेडीया, लिना नेटके, सारीका गाडे, विद्या एक्कलदेवी आदी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment