संतांच्या शिकवणी आचरणात आणल्यास मनुष्याची प्रगतीच ःचौधरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

संतांच्या शिकवणी आचरणात आणल्यास मनुष्याची प्रगतीच ःचौधरी

संतांच्या शिकवणी आचरणात आणल्यास मनुष्याची प्रगतीच ःचौधरी

ह.अशरफ शाह वली दर्गा कमिटीच्यावतीने अन्नदान

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः थोर संत हजरत शाह शरीफ बाबांचे संदल उरुसानिमित्त खिस्तगल्ली येथील हजरत अशरफ शाह वली दर्गा कमिटीच्यावतीने भंडारा-महाप्रसादाचा शुभारंभ सामुदायिक विवाहाचे प्रणेते हाजी खलील चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी कुराण पठण, नातशरीक, सलाम पठण करुन फातेहा देण्यात आले.
   याप्रसंगी हाजी खालील चौधरी म्हणाले, संतांची शिकवण ही मनुष्याने आपल्या जीवनात आचणात आणल्यास आपली प्रगती होईल. समाजामधील दूरी दूर होऊन आपले जीवन आनंदी होईल. हजरत अशरफ शाहवली दर्गा कमिटीच्यावतीने हजरत शाह शरिफ बाबांचे उरुसनिमित्त सर्वधर्मियांसाठी अन्नदानासारखे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत, असे सांगितले.
   कार्यक्रम यशस्वीतेसठी दर्गा कमिटीचे प्रमुख सय्यद अन्सार गुलाब पेटीवाले, रफीक बागवान, अरबाज कुरेशी, हाजी अन्वर खान, शेरु पार्टी बाबु डिजेवाले, बारी पिंजारी, सोनू सनईवाले, मो.हनिफ कादरी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here