वस्तू व सेवा करच्या अधिकारीपदी वर्णी लागल्याबद्दल श्रध्दा जाधव हिचा गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

वस्तू व सेवा करच्या अधिकारीपदी वर्णी लागल्याबद्दल श्रध्दा जाधव हिचा गौरव

 वस्तू व सेवा करच्या अधिकारीपदी वर्णी लागल्याबद्दल श्रध्दा जाधव हिचा गौरव


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्रध्दा गणेश जाधव यांची वस्तू व सेवा कर वर्ग दोनच्या अधिकारीपदी वर्णी लागल्याबद्दल स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य पै.नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, लक्ष्मण चौरे, गोरख जाधव, ह.भ.प. बबन महाराज जाधव आदी उपस्थित होते.
गावातील श्रध्दा जाधव हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन वस्तू व सेवा कर वर्ग दोनच्या अधिकारी होण्याचा बहुमान मिळवून गावाचे नांव उंचावले आहे. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून, समाजाच्या विकासात्मक जडण-घडणीत मोलाचे योगदान देत आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने लग्नानंतर मिळवलेले यश कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले. श्रध्दा जाधव हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करताना प्रारंभी अपयश आले. मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने प्रयत्न करुन यश संपादन केले. मुलींनी लग्नानंतर देखील शिक्षण बंद न करता आपली गुणवत्ता व क्षमता स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून सिध्द करण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment