लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज फार काळ दाबता येत नाही ः सरोदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 9, 2021

लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज फार काळ दाबता येत नाही ः सरोदे

 लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज फार काळ दाबता येत नाही ः सरोदे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पीस फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक महिन्याला समाजातील ज्वलंत प्रश्नावर लोकसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.यावेळी विषय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सादय स्थिती आणि आपण* याविषयावर बोलतांना मानव अधिकार कार्यकर्ते व ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोद यांनी वरील विधान केले. त्यावेळी मंचावर लॉ कॉलेजचे प्राचार्य मा. तांबे , सी एस आर डीचे संचालक डॉ सुरेश पठारे, पत्रकार सुधीर लंके, कॉ सुभाष लांडे व पीस फाउंडेशनचे अध्यक्ष आर्कि अर्षद शेख होते.
        सरोदे यांनी सुरुवातीला बीज भाषण केले. त्यावेळी भारतातील आजचे अभिव्यक्तीवर जो घाला घातल्या जात आहे त्याची उदाहरणे देत जगभरात त्या संदर्भात उमटणारे परिणाम व जगातल्या विद्वानाचे लोकशाही, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य मानवी मूल्य धर्मांचे स्थान आदी बाबत मांडणी केली.सुरुवातीला आर्कि. अर्षद शेख यांनी स्वागत करून लोकशाही मूल्य, जागतिक मानवीमुल्य, अभिव्यक्तीची होणारी गळचेपीचे देशातील घटनांचा संदर्भ देत भूमिका मांडली आणि उपक्रमाचा उद्देश सांगितला,प्राचार्य तांबे यांनी सुप्रीमकोर्टाचे ताजे संदर्भ देत म्हणले की लोकशाहीमध्ये जेव्हा लोक जागृत असतात सजग असतात तेव्हा किती मोठी शक्ती असले तरी लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही याचे जगभरात संदर्भ सापडतात.बीज भाषणानंतर मंचावरील डॉ सुरेश पठारे, सुभाष लांडे,सुधीर लंके, आर्कि अर्षद शेख, विठ्ठल बुलबुले, आणि प्रेक्षकांनी विषयाच्या अनुषंगाने असीम सरोदे यांना प्रश्न विचारून चर्चा घडवून आणली.हॉटेल फरहत मध्ये झालेला हा लोकसंवाद कार्यक्रम सुमारे अडीच तास रंगला.यावेळी अहमदनगर मधील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी झाली होती.या लोकसंवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांनी केले .पीस फाउंडेशनच्या वतीने होणार्‍या अहमदनगर डिबेट प्रत्येक महिन्याला एका ज्वलंत विषयावर लोकसंवाद होत राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here