संजना चेमटे यांना शिक्षण संचालकांच्या हस्ते एटीएम रत्न पुरस्कार प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 9, 2021

संजना चेमटे यांना शिक्षण संचालकांच्या हस्ते एटीएम रत्न पुरस्कार प्रदान

 संजना चेमटे यांना शिक्षण संचालकांच्या हस्ते एटीएम रत्न पुरस्कार प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नगर तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील प्रभारी मुख्याध्यापिका संजना चेमटे यांना एटीम परिवार महाराष्ट्रच्यावतीने राज्याचे नूतन शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे ,शिक्षणाधिकारी अरुण धामणे ,अहमदनगर डाएट चे प्राचार्य डी.डी.सूर्यवंशी ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त एटीएमचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ ,रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर  ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नारायण मंगलारम  यांचे हस्ते  नुकताच अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला.
     संजना चेमटे यांनी सध्याच्या यशवंतनगर शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.लोकसहभागातून त्या शाळेचे योग्य परिवर्तन करत आहेत. कोरोनाकाळात त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना अध्यापनाचे धडे दिले आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शन करून त्यांना विविध स्पर्धेत बसविले त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश मिळविले.
कोरोनाकाळात त्यांनी शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी सर्वांगीण विकास करी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला .त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक हे मजुरी करणारे असून त्यांची अर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे त्यामुळे कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी कोरोनाबाबत योग्य ती दक्षता घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
    त्यांनी हा उपक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना सादर केला होता.त्यांच्या या नवोपक्रमाची दखल घेऊन त्याचे परीक्षण होऊन अहमदनगर जिल्ह्यात  त्यांचा चौथा क्रमांक आला. तसेच त्यांनी या नवोपक्रमावर एक पुस्तक तयार करून शिक्षण संचालकांच्या हस्ते पुणे येथे त्याचे प्रकाशन केले. त्याबद्दल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने डाएट संगमनेर  व जिल्हा परिषदेने त्यांच्या या नवोपक्रमाचे अभिनंदन केले.
    त्यांच्या कार्याबद्दल त्यांना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील किनो एज्युकेशन सोसायटीच्यावतीने किनो शिक्षा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून 14 फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.त्यांच्या कार्याबद्दल पालक आणि अधिकारी नेहमी अभिनंदन करतात.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना एटीम परिवाराच्या वतीने शिक्षण संचालकांच्या हस्ते नुकताच अहमदनगर येथे एटीएम रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here