मैदानी खेळाचे महत्व पालकांनी युवकांनी समजून घ्यावे ः रासने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

मैदानी खेळाचे महत्व पालकांनी युवकांनी समजून घ्यावे ः रासने

 मैदानी खेळाचे महत्व पालकांनी युवकांनी समजून घ्यावे ः रासने

वुडन क्रीडा हॉलचे उद्घाटन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सदृढ आरोग्यासाठी महत्त्वपुर्ण असलेल्या मैदानी खेळाचे महत्व पालकांनी व युवकांनी समजून घेण्याची गरज आहे. निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम हा एकमेव उपयुक्त पर्याय आहे. सुदृढ आरोग्य हीच जीवनातील खरी संपत्ती आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवाची किंमत अमूल्य असून, स्वत:च्या निरोगी आरोग्यासाठी शरीरसंपदा जोपासणे ही प्रत्येक युवकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने यांनी केले.
    जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) व मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मोहोज येथे क्रीडा बहुउद्देशीय प्रकल्प अंतर्गत वुडन क्रीडा हॉलच्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी रासने बोलत होते. यावेळी राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल, जय असोसिएशनचे राज्य अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. अनिता दिघे, सरपंच सुधाकर वांढेकर, आदर्श ग्राम विकास अधिकारी भाऊसाहेब बर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप वांढेकर, प्राचार्य रावसाहेब मोरे, द्रोपदाबाई मतकर, आदिनाथ गुंड, देविदास मतकर, जे.बी. वांढेकर, अंगणवाडी सेविका अलका मतकर, भाऊसाहेब वांढेकर, पोपट बनकर, रजनी ताठे, नयना बनकर, सागर आलचेट्टी, शाहीर कान्हू सुंबे, आरती शिंदे, मानव सेवाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील मतकर आदी उपस्थित होते.
   डॉ. अमोल बागुल यांनी किशोर अवस्थेतील युवकांनी अभ्यासाबरोबर व्यायामालाही महत्त्व देऊन शरीरसंपदा जोपासली पाहिजे. शरीराचे आरोग्य सुदृढ असेल तर कोणतेही कार्य करताना अडचणी येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. अनिता दिघे यांनी युवती व महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे भविष्यात महिलांना गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. सकस आहार, पुरेसा व्यायाम, योग यामुळे कार्य करण्याची ऊर्जा मिळते व मन प्रसन्न राहून शरीर निरोगी राहते. युवतींनी देखील मैदानाकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब बर्डे यांनी ग्रामीण विकासामध्ये मानवसेवा प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनीय असून, शासनाच्या विविध प्रकल्प व योजनांमध्ये मानवसेवा खर्या अर्थाने कार्य करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील मतकर यांनी केले. ज्ञानेश्वर गुंड आणि अनिता गुंड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आभार शुभम मतकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश घाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय वांढेकर, बोरुडे दाजी, विष्णू जमदाडे, विष्णू दातीर, राजकवर दातीर, सतीश पाचे, गणपत शिंदे, वैशाली नाचन आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment