दिलीप गांधींनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 25, 2021

दिलीप गांधींनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट..

 दिलीप गांधींनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट..

रेल्वे रोको आंदोलनावर संघटना ठाम.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर - पुणे शटल सेवा सुरू करण्यासाठी सामाजिक संघटनांनी 13 मार्चला रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. माजी खासदार दिलीप गांधींनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना या मागणीचे निवेदन देवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र आंदोलकांनी रेल्वेमंत्री लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची माहितीचा आंदोलनाचे निमंत्रक अ‍ॅड कारभारी गवळी यांनी दिली.
   नुकतेच अहमदनगर रेल्वे स्थानक येथे सदर रेल्वे सुरु करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे रोकोचा इशारा देण्यात आला होता. यामध्ये पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागृक नागरिक मंच, हरदिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाऊंडेशन, फिनिक्स सोशल फाऊंडेशन संघटना सहभागी होणार आहेत. तर या आंदोलनासाठी हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अ‍ॅड. कारभारी गवळी, सुहास मुळे, जालिंदर बोरुडे, संजय सपकाळ, रमेश बाफना, धनेश बोगावत, ए.बी. बोरा, दत्तात्रय गायकवाड, अन्वर सय्यद, हुसेन सय्यद, जयकुमार मुनोत, राजेंद्र पडोळे, कैलास दळवी, बहिरुनाथ खंडागळे, जयराम मल्लिकार्जुन, सुवालाल ललवाणी प्रयत्नशील आहेत.
   अहमदनगर-पुणे (व्हाया काष्टी, केडगाव) रेल्वे कॉड लाईनचे काम मागील पाच ते सहा वर्षापासून सुरू होते. ते काम पूर्ण झाले आहे. अहमदनगर व पुणे शहरातील नागरिकांची अनेक वर्षापासून सकाळ व संध्याकाळ ही शटल रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आहे. दौंड रेल्वे स्टेशन बाहेरील कॉड लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले असून, सदरील रेल्वे सेवा त्वरित सुरू करता येऊ शकते. कॉड लाईनचे काम मागच्या वर्षी पुर्ण झाले. मात्र कोरोना महामारीमुळे ही रेल्वेसेवा सुरू होऊ शकलेली नाही. तरी 1 एप्रिल पासून अहमदनगर-पुणे रेल्वे सेवा सुरू करुन नगरकरांना नवीन वर्षाची भेट द्यावी व याबाबतचे जनरल मॅनेजर मुंबई व डी.आर.एम. सोलापूर यांना आदेश देण्याची मागणी निवेदनाद्वारे खासदार गांधी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here