छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते-दिग्वीजय आहेर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते-दिग्वीजय आहेर

 जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेत  छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते-दिग्वीजय आहेर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ःछत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि आपलं स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन केलं. एवढेच नव्हे तर आपल्या प्रचंड धामधुमीच्या काळात मुलकी कारभार व सैनिकी व्यवस्था, नौसेना, आरमार उभारले, स्वराज्यात शासकीय कामाची आदर्श कार्यपद्धत निर्माण केली. समाज व धर्म तसेच सांस्कृतिक कार्य मोठ्या प्रमाणावर केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते. त्यांचे हे कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ प्रणित जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेत  राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, तालुका उपनिबंधक के.आर.रत्नाळे, संस्थेचे प्रशासक किरण आव्हाड, मानद सचिव प्रकाश कराळे, संचालक यशवंत ओव्हळ, सभासद व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनतील अनेक प्रसंगी सांगून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. शेवटी सचिव प्रकाश कराळे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment