शिवाजी महाराजांप्रमाणे शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक ठेवावी ः कावळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

शिवाजी महाराजांप्रमाणे शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक ठेवावी ः कावळे

 शिवाजी महाराजांप्रमाणे शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक ठेवावी ः कावळे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः मातोश्री प्रतिष्ठाणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती आज बालिकाश्रम रोड येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी दिपक कावळे बोलत होते. स्पर्धा परीक्षा देणार्‍या प्रत्त्येक विद्यार्थ्याने एका परीक्षेत यश नाही मिळालं म्हणून खचून न जाता शिवाजी महाराजांप्रमाणे ध्येय वेड होऊन यश संपादन करावे.
   शिवाजी महाराजांप्रमाणे शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक ठेवावी त्याच प्रमाणे माँ साहेब जिजाऊ प्रमाणे वेळ प्रसंगी तलवार हातात घेऊन शिवाजी महाराजां प्रमाणे छत्रपती घडवले त्याच प्रमाणे आजच्या मुलींनी देखील फक्त चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडून स्पर्धापरीक्षा मध्ये उज्वल यश प्राप्त करून मोठं मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करावे
   यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दिपक कावळे पा. , मयूर कांगणे सर, प्रतिक हिंगडे सर, उपाध्यक्ष महेश शेळके, गणेश बोत्रे, संतोष धेंड, अमृता पारकड, शुभांगी घुले, भाग्यश्री मिसाळ, राहुल पारकड, विशाल सानप, तुषार इखे, पप्पू पाथरे, आमिर शेख, पांडुरंग खेडकर, अजय बडे, मल्हारी बडे, राहुल बारगजे, अजय दहिफळे, गणेश गुंजाळ. आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment