छत्रपतींचा वारसा घेऊन जाणारी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ः झावरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

छत्रपतींचा वारसा घेऊन जाणारी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ः झावरे

 छत्रपतींचा वारसा घेऊन जाणारी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ः झावरे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन जाणारी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर ही एकमेव संस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाल अथवा किल्ले बांधण्यावर जास्त खर्च करण्यापेक्षा रयतेवर अधिक खर्च केला. छत्रपतींमुळेच आज आपण आहोत, असे मत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी व्यक्त केले.
   जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संस्थेच्या सभागृहात साधेपणान साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशे, सहसचिव मा.ऍड.श्री.विश्वासराव आठरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, विश्वस्त मुकेश मुळे, सदस्य राहुल झावरे पाटील, वसंतराव कापरे, अरूणा काळे, न्यू आर्टसचे प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे, रेसिडेन्सिअलचे प्राचार्य ए.आर.दोडके,  लॉ कालेजचे प्राचार्य एम.एम.तांबे, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य महेश नगरकर, कै.यशवंतराव गाडे पाटील अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या एस.पी.धिरडे, महाराष्ट्र बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शेवाळे व प्राध्यापक उपस्थित होते.
   यावेळी जी.डी.खानदेशे म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराजांना वर्षापेक्षा आणखी आयुष्य लाभले असते तर जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत त्यांनी स्वराज्य स्थापन केले असते. असे सांगून छत्रपतींच्या इतिहासाला उजाळा दिला व आपली संस्था ही एक शैक्षणिक तिर्थक्षेत्र व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
अ‍ॅड.विश्वासराव आठरे पाटील  म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पुर्वसंधेला विद्यापीठ अनुदान आयोगाने संस्थेच्या न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज अहमदनगरला ऍटोनॉमस दर्जा प्रदान केल्याबद्दल प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे व सर्व कर्मचार्यांचे अभिनंदन केले.
   प्राचार्य दोडके यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. सूत्रसंचालन धनंजय म्हस्के यांनी केले तर  आभार मोटे बी. के. यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here