शिवरायांनी पुन्हा जन्म घेतला, तरच महिलांवरील अत्याचार थांबतील ः वल्लाकटी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

शिवरायांनी पुन्हा जन्म घेतला, तरच महिलांवरील अत्याचार थांबतील ः वल्लाकटी

 शिवरायांनी पुन्हा जन्म घेतला, तरच महिलांवरील अत्याचार थांबतील ः वल्लाकटी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी व जनतेसाठी संघर्ष करत रयतेचे राज्य उभारले. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कडक शासन केले. त्यामुळे स्वराज्यात महिला सुरक्षित होत्या.     शिवाजीराजांनी पुन्हा जन्म घेतला, तरच महिलांवरील अत्याचार थांबतील. असे प्रतिपादन शहर भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पहिलवान अंजली वल्लाकटी यांनी केले.
शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व रथसप्तमीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली वल्लाकटी यांनी केले होते. बालिकाश्रम रोडवरील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिला पदाधिकारी भगव्या साड्या परिधान करत उत्साहात सहभागी झाल्या होत्या. आकर्षक सजावट केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सर्वांनी विधिवत औक्षण करून अभिवादन केले. हळदी कुंकूवानिमित्त सर्व महिलांना कापडी मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सुरेखा विद्ये, ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रिया जानवे, सविता तागडे, नगरसेविका सोनाली चितळे, समता दमाणी, कांचन डोंगरे, ज्योती दांडगे, योगिता देवकर आदी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here