श्रीगोंदा तालुक्यात विना मास्क फिरल्यास कडक कारवाई करणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

श्रीगोंदा तालुक्यात विना मास्क फिरल्यास कडक कारवाई करणार

 श्रीगोंदा तालुक्यात विना मास्क फिरल्यास कडक कारवाई करणार 

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा -
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढू लागल्याने अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केलेल्या आवाहनानुसार श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी रस्त्यावर उतरून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विनामास्क फिरणार्‍याच्या विरोधात श्रीगोंदा शहरात जनजागृती करत धडक कारवाई सुरू केली.

  या बाबत सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी श्रीगोंदा तालुक्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात ठीक ठिकाणीं तसेच बस स्थानक परिसर, महाविद्यालये, शाळा कॉलेज परिसरात जनजागृती करत विना मास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी शहरात विना मास्क फिरणार्‍या 100 नागरिकांकडून सुमारे 10 हजार रूपये दंड आकारणी करत त्यांना मास्क, सेनेतायझर, तसेच सोशल दिस्टांस ठेवण्याचे आवाहन केले.पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते, संतोष कोपणर, कुलदीप घोळवे, भानुदास नवले, शरद गावडे आदींनी काम केले.

No comments:

Post a Comment