ब्लड कॅन्सरवर मात करण्यासाठी युनूस सय्यदला मदतीची गरज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

ब्लड कॅन्सरवर मात करण्यासाठी युनूस सय्यदला मदतीची गरज

 ब्लड कॅन्सरवर मात करण्यासाठी युनूस सय्यदला मदतीची गरज


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळसारख्या ग्रामीण भागातून सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून 26 वर्षीय युनूस सय्यद शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याला गेला होता मात्र परंतु नियतीच्या मनात वेगळेच असल्याने सनदी अधिकारी होण्याअगोदरच त्याला रक्ताच्या कर्करोगाने (ब्लड कॅन्सर) गाठले. कॅन्सरवर मात करण्यासाठी तब्बल आठ लाख रुपयांची गरज असून आर्थिक परिस्थितीमुळे तो सध्या या रोगाशी झुंज देत आहे, सामजिकभान असलेल्या लोकांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करत वाट पाहत आहे.
युनूस सय्यद याने घरचे असणारे अठराविश्वे दारिद्रय शिक्षणाच्या आड न येऊ देता माध्यमिक शिक्षण पुर्ण करत पुणे येथे दिवसा कॉलेज तर रात्रीला सुरक्षारक्षकाची नोकरी करून फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे उच्च शिक्षण पुर्ण करत मनातील सनदी अधिकारी होण्याचे असलेलं स्वप्न उराशी बाळगून होता व तशी तयारीदेखील त्याने सुरू केली होती. मात्र कोरोना मुळे झालेल्या लॉकडाउनकाळात गावी आल्या नंतर त्याची तब्येत बिघडली होती काय होतेय हे त्यालाही समजत नसल्याने व अचानक एके दिवशी वेदना असह्य झाल्याने त्याने दौंड येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना दाखविले. डॉक्टरांनी त्याला चाचण्या करायला लावल्या .या चाचण्यात त्याला ध्यानी मनी नसलेला ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले. उपचारासाठी खासगी रुग्णालयात 18 लाख रुपयांचा खर्च सांगितल्याने तो मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्या ठिकाणी आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र युनूसची आई दुसर्‍यांच्या शेतात मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा ओढत आहे. असे असताना पैसे उभारायचे कसे , असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला समाजातून आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले असून. या आजारातून युनूसला वाचवण्यासाठी येणारा कहरच आठ ते दहा लाख रुपये असल्याचे रुपये खर्च दवाखाना व्यवस्थापनाने सांगितले असून यासाठी सढळ हाताने उपचारासाठी मदत करावी. असे आवाहन युनूसच्या आईने केले आहे. अधिक माहितीसाठी 7304928897 या क्रमांकावर संपर्क करावा. किंवा युनुस मुनीर सय्यद यांच्या खउखउख बँकेच्या 172301001144 खऋडउ उजऊए : खउखउ0001723 या बँक खात्यात किंवा 7304928897 या गुगल पे, फोन पे वर मदत निधी म्हणून जमा करावी अशी विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment