पीठ गिरणी कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी खामकर तर उपाध्यक्षपदी बोळगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

पीठ गिरणी कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी खामकर तर उपाध्यक्षपदी बोळगे

 पीठ गिरणी कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी खामकर तर उपाध्यक्षपदी बोळगे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः महाराष्ट्र राज्य निरंतर सेवा पीठ गिरणी कामगार संघटनेच्या मंगळवार दि.16 फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा येथे झालेल्या बैठकीत संघटनेच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी माधव खामकर यांची तर उपाध्यक्षपदी संतोष बोळगे यांची राज्य अध्यक्ष प्रभाकर बागुल यांनी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची श्रीगोंदा कार्यकारिणी तयार करत सचिवपदी उत्तम भालेकर, कोषाध्यक्षपदी दिलीप उगले, किसन राउत, बबन धावडे, संपर्कपदी घनश्याम घोडके यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना खामकर यानी सांगितले की पीठ गिरणी कामगारांना अनेक समस्या असून विजेच्या समस्ये मुळे पीठ गिरणी चालविणे जिकरीचे झाले असल्याने याचा पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातुन करणार असल्याचे सांगत श्रीगोंदा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चौघुले याना विजेसंधर्भात निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. यावेळी राज्य सचिव अशोक सोनावणे यांच्या सह अनेक पीठ गिरणी कामगार उपस्थित होते.कार्यक्रमाचे समारोप विलास कुरुमकर यांनी केला.

No comments:

Post a Comment