न्यु इंग्लिश स्कुल मढेवडगाव सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्नेहमेळावा उत्साहात संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 17, 2021

न्यु इंग्लिश स्कुल मढेवडगाव सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.

 न्यु इंग्लिश स्कुल मढेवडगाव सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील न्यु इंग्लिश स्कुल विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि.14 फेब्रुवारी रोजी विद्यालयात माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक व सेवक यांचा स्नेह मेळावा प्रा.प्रभाकर राव रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे संस्थेचे विभागीय सहा.अधिकारी शिवाजीराव तापकीर साहेब उपस्थित होते.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेसमोर द्विप प्रज्वलन करून करण्यात येऊन पहिल्या बॅचच्या चार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 1975 पासून 2015 पर्यंतचे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. जमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यानी विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी 6 लाख 77 हजार 255 रूपये रोख व चेक माध्यमातून जमा केले. तर जयदीप मांडे यांनी 3 वर्गखोल्यांची फरशी बसवून देण्याचे जाहीर केले व उमाकांत राऊत यांनी सर्व खोल्यांचे लाईट फिटिंग मजुरी करून देण्याचे कबुल केले तर विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व सेवक व कर्मचारी यांनी मिळून 1 लाख 21 हजार रोख देणगी जमा केली तसेच मॅनेजिंग कोन्सिल सदस्य बाबासाहेब भोस व कण्हेरकर सर यांच्या प्रयत्नातून आलेला 15 लाख रुपयांचा चेक सहा.विभागीय अधिकारी तापकीर यांच्या मार्फत मुख्याध्यापक व ग्रामस्थांनी स्वीकारला. यावेळी स्कुल कमिटीचे रवींद्रराव महाडिक, पं. स.सदस्य जिजाबापू शिंदे, सुभाष काका शिंदे, सरपंच महानंदा मांडे , नंदिनी वाबळे, संतोष गुंड , पं. स.माजी उपसभापती बाळासाहेब नलगे , बापूसाहेब वाबळे , उपसरपंच जयश्री ताई धावडे ,स्मितल वाबळे, कल्याणी ताई गाढवे, तसेच सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नवनाथ बोडखे यांनी केले तर शिंदे एम.डी. यांनी सूत्रसंचालन केले. आभार फुलसिंग मांडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here