तहसीलदारांनी पकडलेला वाळूचा ट्रक कार्यालयाच्या आवारातून गायब ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

तहसीलदारांनी पकडलेला वाळूचा ट्रक कार्यालयाच्या आवारातून गायब !

 तहसीलदारांनी पकडलेला वाळूचा ट्रक कार्यालयाच्या आवारातून गायब !

कारवाईबाबत विचारणा होताच 14 तासांनी तोच ट्रक रिकामा करून पुन्हा माघारी आणून तहसील आवारात उभा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा शहरात श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदिप पवार व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा शहरातून अवैध वाळू वाहतूक करणार्‍या एका ट्रकवर छापा टाकूत पकडून तहसिल कार्यालयाच्या आवारात आणुन जप्त केले असता ती वाळूनी भरलेली ट्रक मध्यरात्री पकडल्यानंतर अवघ्या एक तासात तहसील कार्यालयाच्या आवारातून गायब झाल्याने तहसीलदार यांनी आर्थिक तडजोड करून सोडला की राजकीय दबावाला बळी पडून ट्रक सोडला. करवाई बाबत विचारणा होताच 14 तासांनी तोच ट्रक रिकामा करून पुन्हा माघारी आणुन तहसील आवारात उभा केल्याने शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार व त्यांच्या पथकाने श्रीगोंदा शहरात मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा मांडवगण रोडवर एक अवैध वाळू वाहतूक करणारी ट्रक पकडून तो तहसील कार्यालयाच्या आवारात आणून जप्त केला परंतु हा ट्रक एका राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्याचा असल्याने अवघ्या एकच तासात तहसील कार्यालयाच्या आवारातून ट्रक गायब झाला. करवाई बाबत विचारणा होताच 14 तासांनी तोच ट्रक रिकामा करून पुन्हा माघारी आणुन तहसील आवारात उभा केल्याने तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी आर्थिक तडजोड केली अथवा राजकिय नेत्याच्या दबावाला बळी पडून सदरचा वाळूने भरलेला ट्रक सोडून दिला याबाबत शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. तालुक्यातील घोड भीमा नदी पत्रातील वाळूचा कोणत्याही प्रकारचा लीलाव झाला नसताना मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी केली जाते. यामुळे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून वाळू चोरी वाहतूक करणारे गाडी चालक मालक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही तालुक्यात वाळू चोरी चालूच आहे. या अवैध वाळू तस्करी करणार्‍या विरोधात पोलीस प्राशासन व महसूल यंत्रणा एकत्र कार्यवाही करत आहे. त्यानुसार दि.7 रोजी मध्यरात्री वाळूचा ट्रक तहसील पटांगणात लावून त्यानंतर एका राजकीय कार्यकर्त्याने स्वतःची वाळूने भरलेली गाडी घेऊन गेल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. याबाबतची सखोल चौकशी करून सदर गाडी चालक व मालक यांच्या वर कार्यवाही करावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे. परंतु तहसीलदार यांनी ट्रकचा नंबर व मालकाचे नाव देण्यास नकार दिला.तसेच तहसीलदार यांनी त्या ट्रक मालक चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सोडून त्या ट्रक मालकाला ट्रक तहसील कार्यालयात आणून लावण्यास सांगितले यामुळे त्यांच्या करवाईबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

रविवारी मध्यरात्री श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी श्रीगोंदा शहरात अवैध वाळू वाहतूक करणारा वाळूने भरलेला ट्रक पकडुन जप्त करून कार्यालयाच्या आवारात लावला असता परंतु सदर ट्रक चालक मालकाने जप्त केलेला ट्रक पळून नेला. या बाबत तहसीलदार प्रदीप पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी त्या ट्रक मालकाला तो ट्रक तहसील कार्यालयात पुन्हा आणुन लावण्यास सांगितले आहे असे सांगत त्यांनी तो ट्रक जर आणून लावला नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे अशी प्रतिक्रिया दिली.

No comments:

Post a Comment