ना. थोरातांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वृद्धांना मिष्टान्न भोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

ना. थोरातांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वृद्धांना मिष्टान्न भोजन

 ना. थोरातांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वृद्धांना मिष्टान्न भोजन  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः राज्याचे महसूलमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा फाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमात नेवासा काँग्रेसतर्फे वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन देऊन एक आगळावेगळा पायंडा पाडला असल्याचे नेवासा काँग्रेसचे  तालुकाअध्यक्ष संभाजी माळवदे यांनी सांगितले .अध्यक्षीय भाषण एससी विभागाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार कांबळे यांनी केले .याप्रसंगी काँग्रेस पुणे शहर एसी विभागाचे अध्यक्ष श्री.कनगरे,जिल्हा सरचिटणीस सुहास कदम , एससी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड,तालुका उपाध्यक्ष सुनील भोगे , सरचिटणीस प्रवीण तिरोडकर , युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष धनवटे,  एनएसयूआयचे  सौरभ कसावने, समीर शेख ,संजय वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here