मोहा येथील ‘रोहयो’च्या कामाची चौकशी करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

मोहा येथील ‘रोहयो’च्या कामाची चौकशी करा

 मोहा येथील ‘रोहयो’च्या  कामाची चौकशी करा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः मोहा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या रोजगार हमीच्या चालु कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. या मध्ये गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती व संबधित अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरू आसलेल्या तीनही रस्त्यांच्या कामांची चौकशी करावी अन्यथा सात दिवसांतअमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या बाबतचे निवेदन तहसीलदार व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी दिले असुन या निवेदनात म्हटले आहे की मोहा येथील मोहा ते डोर्ले रस्त्याचे खडीकरण, बांगर वस्ती ते चितखोरी रस्ता खडीकरण व बांगर वस्ती ते चितखोरी रस्ता अशी तीन कामे सुरू आहेत. मात्र या तीनही रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. या मध्ये गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती व संबधित अधिकारी यांच्या संगनमताने हे काम सुरू आहे. या तीनही रस्त्यांचे प्रत्यक्षात गाव पातळीवर कुठल्याही स्वरुपाचे काम झालेले आढळले नाही. तसेच या कामावरती दाखवलेले मजुर कधीही कामावर गेले नाहीत. प्रत्यक्षात रोजगार हमीच्या योजनेवर हे काम झाले आहे व चालु स्वरूप अढळुन आले आहे. मात्र आम्ही या गावचे रहिवासी आसताना देखील आम्हाला या कामाची कल्पना नाही. कामावरती मजुर म्हणून ज्यांची नावे आहेत त्यांना देखील काम सुरू आहे हेच माहीत नाही असे म्हटले आहे. संबंधित तीनही रस्त्यांच्या कामाची येत्या 7 दिवसात चौकशी झाली नाही तर मोहा ग्रामस्थांनी दि 11 फेब्रुवारी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर लहु डोंगरे, संतोष गर्जे, सोमनाथ डोंगरे, संदिप डोंगरे, शिवमुनी बांगर, पोपट बेलेकर, अंकुश डोंगरे, रामदास डोंगरे, एस एच डोंगरे, रवी बांगर, अशोक बांगर, राजु गर्जे, प्रदिप बेलेकर, श्रीराम झेंडे सह आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment