राहुरी तालुका खरेदी विक्री संघ येथे हरभरा खरेदी केंद्र सुरु - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

राहुरी तालुका खरेदी विक्री संघ येथे हरभरा खरेदी केंद्र सुरु

 राहुरी तालुका खरेदी विक्री संघ येथे हरभरा खरेदी केंद्र सुरु

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः केंद्र सरकारच्या 2020/21 ह्या वर्षाकरता आधारभूत किंमत नाफेड योजनेतर्गत जिल्हा मार्केटिंग फेडरशनच्यावतीने राहुरी व श्रीरामपुर ह्या तालुक्यांसाठी राहुरी तालुका खरेदी विक्री संघ येथे हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात येत असून शासनाने हरभरा पिकासाठी 5100 रूपये क्विंटल भाव जाहीर केलेला असून हरभरा उत्पादक शेतकर्‍यांनी आपली नाव नोंदणी तातडीने करावी अशी माहिती खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री युवराज सुधाकर तनपुरे ह्यांनी दिली.
श्री तनपुरे म्हणाले की केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेतर्गत राहुरी तालुका खरेदी विक्री संघ येथे हरभरा नोंदनी 15 फेब्रुवारी 2021 रोजी सुरु करण्यात आले असून हरभरा उत्पादक शेतकर्‍यांनी आपली नावे नोंदणी राहुरी खरेदी विक्री संघ येथे करावी.नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे नावनोंदणी सोबत देणे आवश्यक असून ह्या मध्ये आधार कार्ड प्रत,7/12 उतार्‍यावर ऑन लाइन पिकांची नोंद असलेला उतारा ज्या मध्ये हंगाम हा शब्द नमूद असावं, आधार कार्डशी सलग्न असलेले बँक पासबुक,शेतकर्‍यांनी कार्यरत असलेला मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे,नावनोंदणी करताना शेतकर्‍याने स्वत उपस्थित राहाणे आवश्यक आहे,शेतकर्‍यांनी बँक खाते देताना जनधन खाते स्वीकारले जाणार नाही, शेतकर्‍यांनी सदर खाते आधारशी सलंग्न आहे का?याची खात्री करणे आवश्यक आहे अन्यथा अश्या शेतकर्‍यांना पेमेंट मिळण्यात अडचण येणार नाही.
नावनोंदणी झालेल्या शेतकर्‍यांना क्रमवारी नुसार माल आणण्याचे दृष्टीने एस एम एस द्वारे कळविण्या त येईल.शेतकर्‍याने माल आणताना ऋ-ट दर्जाचा आणावा अन्यथा माल स्वीकारला जाणार नाही.आद्रता 12 चे आत असावी.सदर योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ द्यावा.असे आवाहन संस्थेचे व्हॉइस चेअरमन व संचालक मंडळाने केले आहे.नावनोंदणी राहुरी तालुका खरेदी विक्री संघ गाडगे आश्रम शाळे समोर येथे होईल नाव व शेतकर्‍यांच्या शेत मालाची प्रत वारी करून खरेदी राहुरी तालुका सहकारी संघाच्या आवारत करण्यात येईल. फोन नंबर 02426 232430 मोबाईल 9665722815 यानंबर चौकशी करावी.

No comments:

Post a Comment