चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच नीलम झेंडे तर उपसरपंच शोभा झेंडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच नीलम झेंडे तर उपसरपंच शोभा झेंडे

 चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच नीलम झेंडे तर उपसरपंच शोभा झेंडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव जिल्हा परीषद गटातील महत्वाच्या असणार्‍या चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडणुकीत सरपंचपदी सौ.नीलम अजिंक्य झेंडे तर उपसरपंचपदी सौ.शोभा मधुकर झेंडे यांची निवड झाली.
तालुक्यातील कोळगाव जिल्हा परीषद गटातील महत्वाच्या असणार्‍या चिखली ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच रामदास झेंडे सर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पैनलने राजकीय खेळी करत 9 -0 अशी निवडणूक जिंकली होती. मात्र निवडून आल्या नंतर सत्तेच्या लालसेपोटी सरपंच उपसरपंच निवडीच्या वेळी यातील 4 उमेदवारांनी सवतासुभा उभारून बंड केल्याने निवडणूक बिनविरोध न होता निवड प्रक्रिया झाली.
यात सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ.निलम अजिंक्य झेंडे व उपसरपंच पदी सौ.शोभा मधुकर झेंडे यांची 1 मताने निवड झाली. निवडून आलेल्या 9 सदस्या पैकी सरपंच, उपसरपंचासह सौ.वैशाली रामदास झेंडे, कुलदीप भैय्या कदम व अक्षय बोखारे हे ठाम राहिल्याने माजी सरपंच रामदास झेंडे यांना आपली ग्रामपंचायत मधील सत्ता आबाधित ठेवण्यात यश आले.

No comments:

Post a Comment