केडगावमध्ये काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी करणार - किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 12, 2021

केडगावमध्ये काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी करणार - किरण काळे

 केडगावमध्ये काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी करणार - किरण काळे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केडगाव मध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक कार्यकर्ते केडगाव मध्ये काँग्रेस पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्यास तयार आहेत. आगामी काळात केडगावमध्ये काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी पक्ष करेल, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. त्यानिमित्त केडगाव मधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच मास्क, बिस्किट आणि कॅल्शियम गोळ्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काळे बोलत होते. काळे पुढे म्हणाले की, केडगाव मध्ये नागरी पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न आजही मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. केडगावच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेसच्या माध्यमातून आवश्यक तो पुढाकार घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.
यावेळी सरचिटणीस नलिनीताई गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने कायम तळागाळातील समाज घटकांना बरोबर घेऊन काम केले आहे. ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त केडगावमध्ये काँग्रेस पक्षाने आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांना शहरातील तज्ञ डॉक्टरांची सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. नीता बर्वे म्हणाल्या की, शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्यामुळे कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सफल झाला आहे. सुनीता बागडे यांनी भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम पुन्हा आयोजित केले जातील असे यावेळी सांगितले. शिबिरामध्ये फॅमिली फिजिशियन डॉ. रेवन पवार, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव हराळ, स्रीरोग तज्ञ डॉ. स्वाती हराळ, अस्थिरोग तज्ञ डॉ. रोहन धोत्रे, मेडिकल ऑफिसर डॉ. राहिंज, फिजीशियन डॉ. बागले, नेत्ररोग तज्ञ डॉ.ताठे यांनी आपली सेवा दिली. शिबिरामध्ये आरोग्य तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय होती. 278 नागरिकांनी यावेळी शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांना या वेळी कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तर परिसरातील लहान मुलांसाठी बिस्कीट आणि खाऊचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यात आले. यावेळी सेवादलाचे डॉ.मनोज लोंढे, निजामभाई जहागीरदार, अनंतराव गारदे, फारुक शेख, कौसर खान, प्रवीणभैय्या गीते पाटील, विशाल कळमकर, अनिसभाई चुडीवाल, प्रशांत वाघ, डॉ. रिझवान अहमद, सौरभ रणदिवे, अमित भांड, प्रमोद अबुज आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here