आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नातवाकडून माऊली सेवा प्रतिष्ठानच्या प्रकल्पाला मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नातवाकडून माऊली सेवा प्रतिष्ठानच्या प्रकल्पाला मदत

 आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नातवाकडून माऊली सेवा प्रतिष्ठानच्या प्रकल्पाला मदत

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दिवंगत स्वातंत्र्य सैनिक बाबुशेठ मुथा (वांबोरीकर) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे नातू शरद मुथा यांनी सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवला. मुथा यांनी नांदगाव परिसरातील डॉ.धामणे यांच्या माऊली सेवा प्रतिष्ठानच्या ’मनगाव’ प्रकल्पातील निराधार मनोविकलांग महिलांची एक दिवसाच्या भोजनाची व्यवस्था केली व त्यासाठीचा धनादेश मोनिका साळवे यांच्याकडे सुपूर्द केला.
प्रकल्पातील लहान मुलांनाही त्यांनी खाऊ वाटप केले. यावेळी जय आनंद महावीर युवक मंडळाचे सेक्रेटरी हेमंत मुथा, अमित गांधी, संतोष कासवा, योगेश मुनोत आदी उपस्थित होते.शरद मुथा म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिक असलेल्या आजोबांकडून सामाजिक कार्याची मोठी शिकवण मिळाली. डॉ.धामणे दाम्पत्य याठिकाणी निराधार मनोविकलांग महिलांची ज्या आपुलकीने सेवा करतात, त्यांना आधार देतात हे अतिशय मोलाचे कार्य आहे. त्यांच्या रुपाने या महिलांना देवच भेटला आहे. अशा कार्यास आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अल्पसा हातभार लावताना मनापासून आनंद होत आहे. समाजानेही खरीखुरी मानवसेवा करणार्‍यांचे हात बळकट करणे आवश्यक आहे.मोनिका साळवे यांनी मनगाव प्रकल्प, येथील महिलांसाठी राबवले जाणारे उपक्रम, महिलांकडून तयार होणारी विविध उत्पादने याबाबत सविस्तर माहिती दिली व मदतीसाठी मुथा यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment