अभ्यासक्रमासाठी कसरत, दहावीची तीन महिन्यांवर परीक्षा, पालकांना काळजी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 17, 2021

अभ्यासक्रमासाठी कसरत, दहावीची तीन महिन्यांवर परीक्षा, पालकांना काळजी.

 अभ्यासक्रमासाठी कसरत, दहावीची तीन महिन्यांवर परीक्षा, पालकांना काळजी.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून एप्रिल, मे महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तीन महिन्यांवर परीक्षा आल्या असल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. तीन महिन्यात विद्यार्थ्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गाने ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 23 नोव्हेंबर पासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले.कोरोनामुळे यंदा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय झाला आहे. दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी साधारण: दहा महिन्यांचा कालावधी दिला जात होता. यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यापासून वर्ग सुरू झाल्याने दहा महिन्याचा अभ्यासक्रम सहा महिन्यात पूर्ण कसा होणार?असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडत असल्याने गोंधळाची स्थिती आहे.
कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया पार पडली आहे. यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केली आहे. दहावी,बारावीचा अभ्यासक्रम जवळपास पूर्ण होत आला आहे.कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त राहून अभ्यास करावा.कोरोनामुळे शिक्षण क्षेत्र  जरी प्रभावित झाले असले तरी ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीपासूनच शिकवण्यात आले आहे. 23 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केले आहे असे शिक्षण विषयतज्ञ महादेव मासाळकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here