पित्याकडून अत्याचार, हत्या! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

पित्याकडून अत्याचार, हत्या!

 पित्याकडून अत्याचार, हत्या! दै नगरी दवंडीचा अंदाज खरा ठरला..

‘त्या’ चिमुरडीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला...


राहुरी - “चिमुरडीचा मृत्यू देह विहिरीत आढळला. अपहरण नवे खूनच” सोमवार दि 15 फेब्रुवारी च्या दै.नगरी दवंडीतील वृत्ता मधील अंदाज तंतोतंत खरा ठरला. जन्मदात्या मुलीचे अपहरण झाले असल्याचा बापाचा बनाव पोलिसांनी हाणून पाडला. जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालातून मुलीवर अनैसर्गिक अत्याचार झाला असल्याचे दिसून आले. मुलीचे वडील शरद गजानन मोरे (वय 35) रा. लोहगाव, ता. नेवासा यांचे विरोधात खून अनैसर्गिक अत्याचार पोस्को कलमागत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी काल रात्री उशिरा नराधम बापाला बेड्या ठोकल्या.

नराधम बापाने स्वत:च्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर दारूच्या नशेत अनैसर्गिक अत्याचार केला. नंतर तिला विहिरीत ढकलून दिले. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. आपले दुष्कृत्य लपविण्यासाठी मग त्यानेच पोलिसांत खोटी फिर्याद देत, मुलीच्या अपहरणाचा बनाव रचला. मात्र, मुलीच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालात सर्व बाबी स्पष्ट झाल्या
बालिकेचा मृतदेह नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात या चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेच पोलिसांनी नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या. याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी या बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  मृत बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात म्हटले आहे. व्हिसेरा राखून ठेवला आहे. घटनेच्या दिवशी व मृत पीडित बालिकेबरोबर शेवटची व्यक्ती तिचा बापच होता. त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे,
तालुक्यातील एका गावात ऊसतोडीसाठी शेजारील तालुक्यातून कुटुंब आले होते. त्यांच्या घरातील चिमुकलीचे शुक्रवारी (ता. 12) रात्री अपहरण झाल्याची फिर्याद तिच्या बापाने पोलिसांत दिली. मात्र, फिर्यादी बापाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. महिला पोलिसांनी मृत बालिकेच्या आईला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, घटनेपूर्वी नवर्‍यासोबत कडाक्याचे भांडण झाल्यावर तो रात्री साडेदहा वाजता मुलीला घेऊन बाहेर पडला. रात्री 11 वाजता एकटाच घरी परतला. मुलीबाबत विचारणा केल्यावर शोधायला लागला,’ असे आईने सांगितले. मुलीबरोबर असणारी शेवटची व्यक्ती म्हणून पोलिसांनी नराधम बापाला काल रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment