पालक व विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात ठिय्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

पालक व विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात ठिय्या

 पालक व विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात ठिय्या

अवाजवी शुल्काची मागणी करणार्‍या गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई होण्यासाठी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत शाळा बंद असून देखील पालकांकडून अवाजवी शुल्काची मागणी, शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचे ऑलनाईन शिक्षण बंद केल्याबद्दल, तर शिक्षणाधिकारी यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशी समितीस सहा महिने उलटून देखील वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शाळेतील पालक व विद्यार्थ्यांनी जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात सदर शाळेवर कारवाई होण्यासाठी पालकांनी जोरदार निदर्शने केली. आंम्हाला शिकायचय, जे देत नाही त्याची फी घेऊ नका, न्याय द्या असे फलक घेऊन विद्यार्थी देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत सर्व शाळा बंद होत्या. मुलांना फक्त ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. राज्य सरकारने देखील शाळांनी जास्तीची फी वसुली करु नये, याबाबत सुचना केल्या होत्या. मात्र गॅलॅक्सी नॅशनल स्कूलने पालकांकडून इतर शुल्काच्या नावाखाली अवाजवी फी वसुली केली. पालकांनी कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शालेय प्रशासनास फक्त ऑनलाईन शिक्षणाची फी देण्याची सहमती दर्शवली. शालेय प्रशासन आजही पालकांकडून कोरोना काळातील संपुर्ण वर्षाची पुर्ण फी भरुन घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. फी भरु न शकलेल्या ओम गुंजाळ (इ. 8 वी) व जय गुंजाळ (इ. 6 वी) या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देखील बंद करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने केलेल्या सुचनांना देखील शालेय प्रशासनाने केराची टोपली दाखवली असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. अवाजवी शैक्षणिक फी मागणार्‍या व फी न भरल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याबद्दल शाळेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांनी लाऊन धरली. सदर मागणीचे निवेदन प्रभारी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांना देण्यात आले. सकाळी 11 वाजता सुरु झालेले आंदोलन दुपार पर्यंत सुरु होते. प्र. शिक्षणाधिकारी सय्यद यांनी गॅलॅक्सी नॅशनल स्कूलला शैक्षणिक शुल्क कमी करुन, अधिकचे शुल्क पालकांना परत करण्याचे व ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठवेलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करुन पूरक मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याचे लेखी आदेश काढल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात वैभव भोराडे, रमेश बेल्हेकर, संदीप गुंजाळ, रामदास ससे, गजानन भांडवलकर, दादा दरेकर, निलेश बांगरे, अंकुश गिते, जकी मुजावर, तुकाराम गिते, बाळासाहेब सांगळे, गजानन गिते, सविता गुंजाळ, सुमय्या पठाण, सुवर्णा गिते, सिमा ससे, वैशाली पवार, रविंद्र बेल्हेकर, वैशाली साळवे आदी पालकांनी सहभाग नोंदवला.

No comments:

Post a Comment