डॉ. पैठणकर अ‍ॅटीकरप्शनच्या ट्रॅपमध्ये - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 17, 2021

डॉ. पैठणकर अ‍ॅटीकरप्शनच्या ट्रॅपमध्ये

 डॉ. पैठणकर अ‍ॅटीकरप्शनच्या ट्रॅपमध्ये


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नेहमीच वादग्रस्त व चर्चेत राहणारे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख व आरोग्य अधिकारी डॉ एन एस पैठणकर आज 2 लाख 50 हजारांची लाच घेताना अ‍ॅटीकरप्शनच्या जाळ्यात अडकले. डॉ पैठणकर यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा महापालिकेत अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या. अखेर त्यांच्या पापाचा घडा भरला. सत्ताधारी व मनपा पदाधिकार्‍यांच्या मुलाचा या ट्रॅपमध्ये हात असल्याचे बोलले जात आहे.
पैठणकर हे घनकचरा अधिकारी झाल्या पासून नेहीच वादग्रस्त आणि चर्चेत राहिले. नगरसेवकांनी पैठणकर यांच्या विरोधात अनेकवेळा आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र पैठणकर यांच्यावर कोणीतीही कारवाई झाली नव्हती. बुधवारी सकाळी आज 10:30 वाजता त्यांना नाशिक विभागाच्या लाचलुचपत विभागाने ठेकेदार कंपनीकडून लाच घेताना पकडले. पथकाने पैठणकर यांच्याकडून पथकाने मोठी रक्कम हस्तगत केली आहे. पैठणकर यांनी कंपनी ठेकेदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील अडीच लाख रुपये घेतांना त्यांना रंगेहाथ पकडले असल्याची माहिती मिळत आहे. डॉ पैठणकर यांनी दि 11 फेब्रुवारी रोजी एका ठेकेदार कंपनीकडे प्रोजेक्टमध्ये त्रुटी असल्याचे सांगून मंजुरीसाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली. ही रक्कम जास्त असल्याचे ठेकेदाराने सांगितल्यावर तडजोडीत 2 लाख 50 हजार द्यावे लागतील असे पैठणकर यांनी सांगितले. ठेकेदाराने अ‍ॅटीकरप्शन विभागात तक्रार करून आज ट्रॅप लावला. व या ट्रॅपमध्ये पैठणकर गुंतले गेले
लाचेची रक्कमजी सावेडी कचरा डेपो अहमदनगर येथे  पंच  साक्षीदारांसमक्ष  स्विकारली. म्हणून गुन्हा. आज गुन्हा दाखल करण्यात आला. कॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. पोनि. किरण एच रासकर, ला.प्र.वि नाशिक, मृदुला एम नाईक, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि नाशिक, पोहवा मोरे, पोहवा गोसावी, पोहवा कुशारे यांनी मा.श्री. सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, नाशिक मा.श्री. निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री विजय जाधव,पोलीस उपअधीक्षक, वाचक,नाशिक लाप्रवि यांचे मार्गदर्शनाखाली कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here