200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत शेखर लंकेला सुवर्णपदक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत शेखर लंकेला सुवर्णपदक

 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत शेखर लंकेला सुवर्णपदक

नेपाळमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील निघोज येथील शेखर दत्तु लंके याने नवी दिल्ली येथे झालेल्या युथ गेम फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. दिल्ली येथे 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत  सुवर्ण पदक पदक मिळाले आहे. अ
खिल भारतीय युथ चॅम्पियन शिपच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामुळे 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर नेपाळ येथे इंटरनॅशनल स्पर्धेसाठी शेखर लंके याची निवड झाली असून तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व या स्पर्धेसाठी भारतातून करणार आहे.
या अगोदर शेखर लंके विविध विभागीय व राज्य पातळीवरील पदके मिळवून नावलौकिक मिळवला आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार्‍या शेखर लंके यांचा सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार करून आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या वर कौतुकाची थाप पण टाकली आहे.
यावेळी विकास लंके.प्रवीण लंके.महेश लंके सचिन लंके.राजू लंके.पंढरीनाथ लंके संकेत लंके मंगेश लंके ,विकास लंके,प्रविन लंके,राजु लंके,सचीन लंके,महेश लंके,संकेत लंके,प्रतीक लंके,पंढरी लंके आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment