वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमाचे पालन केले तर अपघातावर नियंत्रण : देवरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 5, 2021

वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमाचे पालन केले तर अपघातावर नियंत्रण : देवरे

 वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमाचे पालन केले तर अपघातावर नियंत्रण : देवरे  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
महामार्गावर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमाचे पालन केले तर अपघातावर नियत्रंण येईल. बहुतेक अपघात हे वाहन चालवताना मोबाईल वर बोलताना झाले आहेत. शरीर अनमोल आहे. वाहन चालवताना झालेल्या थोडयाशा चुकीमुळे अपघात झाला तर आपला परीवार संकटात येतो. आयुष्यभर परीवाराचा  सांभाळ करण्यासाठी सामना करावा लागतो यासाठी काळजी पूर्वक वाहन चालवावे असे प्रतिपादन  शहर वाहतुक विभागाचे पोलीस निरिक्षक विकास देवरे यांनी केले.
32 व्या  रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत ड्राईव्हर  सेवा ट्रस्ट महाराष्ट्र प्रदेश कार्यालय व महाराष्ट्र हायवे पोलीस व शहर वाहतुक पोलीस अहमदनगर यांच्या संयुक्त विदयमाने सुरक्षा सप्ताह  कार्यक्रम  केडगाव-अरणगाव बायपास येथे आयोजीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी मेहेरबाबा ट्रस्टचे रमेश जंगले, सहायक पोलीस निरिश्चक शशीकांत गिरी, शरद दळवी , उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार, ड्रायव्हर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष गोरख कल्हापुरे, दत्तात्र्य जाधव, उत्तम गाडे, संतोष शिंदे, राजेंद्र धनगर, राजेंद्र ढवण, दत्तात्रय विटेकर, अभयसिंग राठी, अशोक गव्हाणे, पोपट पुंड, सुदाम गव्हाणे, रंगनाथ शिंदे, गणेश परभणे, बाळासाहेब दळवी अतुल कडूस उपास्थित होते.
यावेळी देवरे यांनी अमली पदार्थ सेवन करुन गाडी चालू नये, सिट बेल्टचा  वापर करावा, वाहन जोरात चालवू नये, धोकादायक पद्धतीने माल वाहतूक करू नये, फोनवर बोलू नये, हेल्मटचा वापर करावा अपघात जखमी झालेल्या दवाखान्यात हलवावे आदी मार्गदर्शनक सूचना केल्या.यावेळी गिरी म्हणाले अपघात कमी  होण्यासाठी प्रशासन 31 वर्षापासून वाहतुक सप्ताहाचे आयोजन करत आहे. सुरवातीला सात दिवस, पंधरा दिवस आता महिना भर वाहतुकी चे नियमाचे पालन करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. 31 वर्ष कार्यक्रम घेऊन ही अपघाताची सख्या कमी करण्यात यश आलेले नाही. महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियत्रंण ठेवावे. मदयपान करुन वाहन चालवू नये तसेच मोबाईल वर बोलू नये असे या वेळी आवाहन केले. कल्हापुरे यांनी ट्रस्टच्या वतीने राबवत असलेल्या योजनाची माहिती दिली. आमचा वाहन चालक कसा सुरक्षित राहिल याची काळजी घेण्यासाठी  शिबीर द्वारे वेळोवेळी  मार्गदर्शन केले जात आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या तसेच मुत्यू मुखी पडलेल्या कुंटुबाला आर्थिक मदतही ट्रस्टच्या वतीने दिली जात असल्याचे त्यांनी सांगीतले. सुत्रसंचालन व आभार शरद दळवी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here