कर्जत तालुका पत्रकार संघाकडून डस्टबिनचे व्यावसायिकांना वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 5, 2021

कर्जत तालुका पत्रकार संघाकडून डस्टबिनचे व्यावसायिकांना वाटप

 कर्जत तालुका पत्रकार संघाकडून डस्टबिनचे व्यावसायिकांना वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः येथील स्वच्छता अभियानात पत्रकारांचे अत्यंत चांगले योगदान असून टाकाऊ पासून टिकाऊ अंतर्गत डब्यापासून डस्टबिन हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरणार आहे असे उद्गार तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी काढले. तालुका पत्रकार संघाच्या कर्जत येथे व्यावसाईकाना डस्टबिन वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते
स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अंतर्गत कर्जत शहरात लोक सहभागाच्या माध्यमातून श्रमदानातुन स्वच्छता करताना स्वच्छ कर्जत अभियान उभे राहिले असून यामध्ये पत्रकारांनीही आपला सहभाग नोंदवत कर्जत शहरातील टाकाऊ  तेलाचे पत्र्याचे डबे गोळा केले व त्याचे डस्टबिन बनविले असून ते शहरातील सर्व व्यावसाईकांना वाटण्याचा कार्यक्रम नगर पंचायत कर्जत येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार नानासाहेब आगळे हे होते,
यावेळी कार्यक्रमात प्रास्ताविक  तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आशिष बोरा यांनी करताना टाकाऊतुन टिकाऊ या संकल्पनेचा वापर करत शहरात रस्त्यावर कचरा येणार नाही यासाठी हा उपक्रम घेतला असून त्यास कर्जत नगर पंचायत व सर्व सामाजिक संघटनाचे कलाप्रेमी यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे म्हटले, यावेळी आम्ही कर्जतचे सेवेकरी ग्रुपच्या वतीने उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत, सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने नितीन देशमुख, डॉ शबनम इनामदार,  गटविकास अधिकारी अमोल जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी बोलताना कर्जत शहर धाकटी पंढरी म्हणून ओळखले जातंय मात्र आगामी काळात कर्जत ला स्वच्छतेची पंढरी म्हणून ओळख होणार आहे, असे म्हणत पत्रकाराचे कौतुक केले.
यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मोतीराम शिंदे, उपाध्यक्ष आशिष बोरा, जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे,  सचिव निलेेश दिवटे, मच्छीन्द्र अनारसे, सुभाष माळवे, मुन्ना पठाण, डॉ अफरोज  पठान आदी सह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आम्ही कर्जतचे सेवेकरीचे सदस्य सह नागरिक, महिला उपस्थित होते.
पत्रकारांनी जमा केलेल्या डब्याना  डबे रंगविण्यासाठी सहकार्य करणारे सर्व सामाजिक संघटनाचे कलाप्रेमी, सुनील भोसले, सत्यजित मच्छिंद्र, अक्षय (भैय्या) राऊत, निरंजन काळे, शेखर हिंगे, अमोल गायकवाड, प्रतीक ढेरे, ओंकार शिंदे, प्रणित ढेरे, हर्षदीप सोनवणे, विवेक साळवे, रोहन चौधरी, ऋषिकेश बागल, सुरज परदेशी, कुणाल पवार, महेश वायाळ, शेखर थोरात, अक्षय जाधव, विनोद बोरा आदीसह अनेकांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या शेवटी कर्जत तालुका पत्रकार परिषदेत संघाचे खजिनदार मुन्ना पठाण यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here