उद्या राहुरी मार्केटयार्ड समोर दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 5, 2021

उद्या राहुरी मार्केटयार्ड समोर दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

 सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन!

उद्या राहुरी मार्केटयार्ड समोर दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा


राहुरी - दिल्ली येथे सुरू असलेल्या देशव्यापी शेतकरी संघटनांनी देशामध्ये चक्काजाम आंदोलन घोषित केले आहे. या आंदोलनामध्ये सामील होऊन पाठिंबा देण्यासाठी राहुरी तालुक्यातील सामाजिक संघटना व सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या वतीने उद्या शनिवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मार्केट यार्ड समोर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

या केंद्र शासनाच्या धोरणाचा देशातील व महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटना व पक्ष तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहेत. आंदोलन यशस्वीकरण्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये चक्काजाम आंदोलन करून या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. असे निवेदन सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने काल नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले. याप्रसंगी रवींद्र मोरे, अनिल जाधव, कांतीलाल जगधने, संजय संसारे, राहुल भैया शेटे, संतोष आघाव, अमोल मोढे, गोपी लांबे, सुरेश लांबे, भारत पवार, पिंटू नाना साळवे, सुनिल जाधव, सुनील चांदणे, महेश उदावंत, ज्ञानेश्वर जगधने आदींच्या सह्या निवेदनावर आहे.या आंदोलनामध्ये राहुरी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, अनिल इंगळे, आनंद वने, शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटील) अमोल मोढे, वंचीत बहुजन आघाडीचे राहुरी ता.अध्यक्ष अनिल जाधव, जिल्हा प्रवक्ते डॉ.जालींदर घिगे, अरुण डोंगरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा ताई बाचकर, राहुरी शहर अध्यक्ष पिंटु नाना साळवे, भारत मुक्ती मोर्चाचे संजय संसारे, संविधान बचाव संघर्ष समीतीचे कांतीलाल जगधने, काँग्रेस आय,चे ता.अध्यक्ष अमृत धुमाळ,राष्ट्रवादी काँग्रेस,चे ता.अध्यक्ष धिरज पानसंबळ, आर.पी.आय.ता.अध्यक्ष विलास साळवे, एम.आय.एम चे  इमरान देशमुख, रिपाई ता.उपाध्यक्ष सुनिल चांदणे, छावाचे जिल्हा कार्यध्यक्ष देवेंद्र लांबे, शिवसेनेचे गणेश खेवरे, समता परीषेदेचे प्रशांतभाऊ शिंदे, इत्यादी संघटनेचे व पक्षाचे कार्यकर्ते या देशव्यापी चक्काजाम आंदोलनामध्ये सामील होणार आहे. केंद्र शासनाने दिल्ली येथील आंदोलनातील शेतकर्‍यांचे रस्ते खोदून काँक्रिटीकरण करून त्यामध्ये मोठे खिळे व लोखंडी गज रोवले आहेत, या आंदोलक शेतकर्‍यांचे अन्नपाणी, विज, पाणी इत्यादी जीवनावश्यक सुविधा बंद करून एक प्रकारे एखाद्या दुश्मन राष्ट्राच्या सैन्यासोबत जशी नीती अवलंबली जाते तशी नीती हे शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार आपल्याच देशातील शेतकरी आंदोलना सोबत करत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here